गुरुवार, १ मे, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" भगवंतावर स्थिर असणारे मन सदैव शांत असेल ". 

पुष्प अठरावे पुढे सुरु  

              त्यानंतर ७९ पानावरील मजकुर स्वामींनी सूचित करून पुन्हा तेथे ( IMP ) म्हणजेच महत्वाचे असे लिहिले . 
             ........परमेश्वराच्या शाश्वत , नित्य या गुणांवर आपण आपले लक्ष्य केंद्रित केले पाहिजे . ती आपल्याला सांगते आहे की आपण जगावर भरवसा ठेवू नये . तसेच मृत्यूची भीती बाळगू नये आणि आपल्याला परमेश्वराचे विस्मरण होऊ नये . राधेने आपल्याला हे तीन मुख्य आदेश दिले आहेत . राधा आपल्याला सांगते आहे की आपण सदैव आणि सर्व गुणांमध्ये परमानंदाची अनुभूती घेतली पाहिजे . तसेच विशेषतः इतरांच्या उत्कर्षाने मनात निर्माण होणाऱ्या द्वेषभावनेचे उच्चारण केले पाहिजे . राधेने गोपिकांच्या मनातील संशय दूर करून त्यांना द्वेषभाव त्यागण्यास प्रवृत्त केले . 
          माझे जीवन हे असे आहे . माझे चित्त परमेश्वराशिवाय इतर कोठेही लागत नाही . मी जगावर विश्वास ठेवत नाही . एवढेच नाही तर मला जगाकडे पहायची भीती वाटते . हे जग मला परमेश्वरापासून अलग करेल अशी मला भीती वाटते ! सर्व सांसारिक लोक त्यांच्या ' मी आणि माझे ' म्हणजेच अहंकारामुळे परमेश्वरापासून वेगळे झाले आहेत . मी परमेश्वरामध्येच होते परंतु जगाने मला त्यांच्यापासून वेगळे केले . मी त्यांना विसरू शकत नसल्याने मी त्यांच्यासाठी तळमळतेय , अविरत अश्रू ढाळतेय . सर्वजण म्हणतात की त्यांना परमेश्वराचा विचार वा स्मरण करणे अशक्य आहे आणि मी म्हणते की मला त्याचे एका क्षणासाठीही विस्मरण होणे अशक्य आहे ! हा इतरांच्या आणि माझ्यामधील फरक आहे . ते एकक्षणही परमेश्वराचा विचार करू शकत नाहीत आणि मी क्षणभरही त्याला विसरू शकत नाही . 
           त्या पुस्तकात राधा म्हणते , " मृत्यूचे भय बाळगू नये ; तथापि मला मृत्यूचे भय वाटते . म्हणून मृत्युपासून सुटका करून घेण्यासाठी मी परमेश्वराला धरून ठेवले . जरी तुम्हाला मृत्यूचे भय वाटत असले तरी तुम्ही त्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही . तुम्ही जन्म घेतला की मृत्यू अटळ आहे . परमेश्वराला धरून ठेवणे हा एकमेव सुटकेचा मार्ग आहे . जर ' मी आणि माझे ' नसेल तर तेथे द्वेषभाव नसतो . अहंकारापोटी द्वेषभाव येतो . इतरांकडे पाहून तसेच इतरांशी आपली तुलना केल्यानेही आपल्या मनात द्वेषभाव उत्पन्न होतो . आपले चित्त केवळ परमेश्वराला प्राप्त करून घेण्याकडे लागलेले असावे .

जय साई राम

व्ही.एस.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा