गुरुवार, १५ मे, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

            " जर आपले मन परमेश्वरावरील प्रेमाने परिपूर्ण असेल तर क्रोध , द्वेष , मत्सर यासारखे भाव आपल्याला स्पर्श करत नाहीत ". 

पुष्प १९ पुढे सुरु 


             आमचे नाते सामान्य नाही . हे परमेश्वर आणि त्याच्या शक्तीमधील नाते आहे . आता आपण ७६ व्या पानावरील मजकूर पाहू त्यामध्ये त्यांनी राधेच्या वस्त्रप्रावरणांविषयी  सांगितले आहे .
            ....... ती पायात आसक्तीचे पैंजण घालत असे . त्या पैंजणांमधून येणारा आवाज कलंकित करणाऱ्या आवाजासारखा असतो . त्यातून असे सूचित होते की आसक्तीमधून केवळ दोष आणि कलंक आपल्या हाती येतो . तिने असेही सांगितले की ती इंद्रियांपासून बनवलेला हार गळ्यात घालत असे . आणि त्यामुळेच तिने स्वतःला राधेमध्ये परिवर्तित केले , एखाद्या फळाच्या तयार रसाप्रमाणे बनवले . याचा अर्थ त्या फळाच्या बिया , चोथा , साल अशा निरुपयोगी गोष्टी आपोआप बाजूला झाल्या . परमेश्वराप्रती विशुद्ध प्रेम हेच त्याचे कारण आहे . परमेश्वराचे विशुद्ध प्रेम लाभल्यावर तिला इतर व्यक्तींच्या प्रेमाचे महत्व नव्हते . 
            हे माझे जीवन आहे . स्वामींनी मला पैंजण घालण्यास सांगितले . या जगामध्ये सर्वांना आसक्तीमधून येणारा जन्म मृत्युचा दोष लागला आहे . मनुष्य कलंकरहित शुद्ध आत्मा आहे , परमात्म्याचा   अंश आहे . तथापि अत्यंत तीव्र भौतिक इच्छा आणि आसक्ती यामुळे तो पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या येरझारा घालतो . एकदा का त्याने हे जाणले की तो परमात्मस्वरूप होतो . पैंजण सौंदर्यवर्धनासाठी घालायचे नसतात . आपण टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक ते ' मी ' 'मी ' असा अहंकाराचा आवाज करतात . ज्याला अहंकार नाही तोच पैंजण घालण्यास पात्र असतो, अथवा कोणीही नाही.  तथापि राधेने ' मी आणि माझे ' याचेच पैंजण पायात घातले . इंद्रियांचा हार गळ्यात घातला . या दागिन्यामधून तिचे इंद्रियांवर नियंत्रण असल्याचे सूचित होते . माझी सर्व इंद्रिये वशिष्ठ गुहेत स्वामींमध्ये विलीन झाली . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........

जय साई राम



             
              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा