ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरावर केंद्रित असणारे भाव मनुष्याला जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत करतात ".
वसंतामृतमाला
पुष्प १९
तेज परतले
' पराभक्ती पुस्तकातील ७४ व्या पानावर स्वामींनी खालील मजकुरास कंस केला . ........ एकदा राधा कृष्णाचे चिंतन करत असताना , कृष्णाचे दिव्यत्व प्रखर तेजस्वी स्वरूपामध्ये बाहेर पडले . त्या दिव्यत्वाने स्वतंत्र रूप धारण केल्याने , कृष्णाला सोडून ते पुढे पुढे जाऊ लागले आणि तेज परत मिळवण्यासाठी कृष्ण त्याच्यामागे जाऊ लागला . अखेरीस तेजाने राधेच्या देहात प्रवेश केला . ही ज्योत राधेमध्ये विलीन झाल्याच्या संदर्भात , आल्हादिनी शक्ती म्हणूनही राधेचे वर्णन केले जाते . हे नाम आनंदाचे द्योतक आहे . हा परमानंद कृष्णाच्या बाहेर पडून राधेच्या देहात विलीन झाल्यामुळे कृष्णाला त्याचे तेज परत मिळवण्यासाठी राधेकडे यावेच लागले .
राधा कृष्णाची आल्हादिनी शक्ती आहे . कृष्णापासून बाहेर पडलेल्या तेजाने राधेमध्ये प्रवेश केला हे त्यांनी दर्शवले . सर्वांवर सारखेच प्रेम केले पाहिजे . परमेश्वर प्राप्तीसाठी उच्च ज्ञान वा धर्मग्रंथाचे ज्ञान असणे गरजेचे नाही . परमेश्वर प्राप्तीसाठी प्रेम पुरेसे आहे हे राधाकृष्णांनी दाखवले आणि आता स्वामी अन् मी हे दाखवत आहोत . परमेश्वर सर्वांमध्ये स्थित आहे . तथापि हे नुसते पुन्हा पुन्हा म्हणून त्याचा काही उपयोग नाही . भौतिक जीवन लोकांच्या इतके अंगवळणी पडले आहे की परमेश्वर सर्वांच्या अंतर्यामी आहे हे समजणे त्यांना शक्य होत नाही .
मग खरा आनंद मिळवायचा कसा ? हे दर्शवण्यासाठी स्वामी आणि मी येथे आलो . आम्ही तेच राधा कृष्ण आहोत , आमच्या प्रेमाद्वारे जगामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत . द्वापारयुगात एके दिवशी कृष्ण कृपेने रूप धारण करून राधेमध्ये प्रवेश केला . आज स्वामी आणि मी हे वेगळ्या पद्धतीने दाखवत आहोत . त्या तेजाने माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि मी जन्मले . स्वामींना प्राप्त करून घेण्यासाठी मी तप केले . केवळ स्वामी आणि स्वामींचे चिंतन हेच माझे जीवन आहे . माझा देह पुन्हा ज्योतीरूप धारण करून स्वामींमध्ये विलीन होईल .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा