गुरुवार, २२ मे, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार
  
          " जन्म म्हणजे काय ? मागील जन्माचा पुढे चालू राहणारा भाग ". 

वसंतामृतमाला 
पुष्प २०
गंगेने आणिले शिवास भूतली 

१४ जून २०१३ , ध्यान 
वसंता - स्वामी , हे गंगाष्टकम् काय आहे ? 
स्वामी - मी तुला हे गंगाष्टकम् दिले आहे . महाविष्णू जिचे उगमस्थान , ती गंगा अवतरून विश्वाचे वैकुंठात रुपांतर करते . पृथ्वी गंगेचा वेग सहन करू शकत नाही . त्यामुळे भगवान शिव तिचा शक्तिशाली प्रवाह आपल्या मस्तकावर घेत नंतर पृथ्वीवर पाठवतात . तू म्हणालीस की कोटीसूर्य समप्रभ कारुण्याचे तेज हे विश्व सहन करू शकत नाही . म्हणून मी हे सर्व माझ्या मस्तकावर धारण करत त्यातील काही किरण पृथ्वीवर पाठवतो . " वैश्विक मुक्ती " हा त्यातीलच एक किरण मात्र आहे . तसेच कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन हा दुसरा किरण आहे . इतर किरण वैश्विक कर्म संहार करतात . अशा प्रकारे तू थोडे कार्य करतेस . 
ध्यान समाप्त . 
            आता आपण या विषयी पाहू या . स्वामींनी मला गंगाष्टक दिले . शंकराचार्यांनीही गंगाष्टक लिहिले आहे . परंतु हे गंगाष्टक मध्वाचार्यांचे शिष्य आनंदतीर्थ यांनी लिहिले आहे . माझ्या जीवनाची तुलना स्वामींनी या अष्टकाशी करावयास सांगितली . त्याचा पहिला चरण खाली देत आहे . 
हे पवित्र गंगे , 
                 जोवर पापी नाही पोहोचत तुझ्या तीरास 
                 तोवर पापातून मुक्ती नाही त्यास 
                 पुरे एक जलबिंदू तुझा 
                 त्याचिया पापसंहारणास 
                 हे देवते , रक्षण करिसी तू , 
                 सकल पापी पीडितांचे . 
हे गंगे , 
          तुझ्या पवित्र जलतुषारांच्या ओझरत्या स्पर्शाने धुपतील पापराशी अन गंगून नष्ट होतील पापांचे पर्वत . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा