रविवार, १८ मे, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " परमेश्वर प्राप्तीची इच्छा तुम्हाला मुक्त करते , भौतिक कामना तुमच्यासाठी बंधने निर्माण करते ". 

पुष्प १९ पुढे सुरु 

          स्वामींनी मला काही रत्ने देऊन त्याचे , पंचतत्वांच्या नियंत्रणाचे प्रतिक म्हणून एक पदक बनवायला सांगितले . त्यानंतर त्यांनी मला १४ खडे दिले . त्याचे चांदणीच्या आकारातील नेकलेस बनवून त्यातील प्रत्येक चांदणीवर एक खडा जडवून त्याला पंचतत्वांचे पदक जोडण्यास सांगितले . यामधून असे सूचित होते की गर्भकोटम मधून १४ नूतन भुवने आणि नूतन पंचतत्वे यांची उत्पत्ती होईल . हे सर्व स्वामींच्या आणि माझ्या भावविश्वामुळे घडेल  . स्वामींनी मला बनवण्यास सांगितलेल्या दागिन्यांमधून हे दर्शवले जाते . त्यानंतर त्यांनी मला ९ रत्ने आणि त्याचे हृदयाच्या आकाराचे पदक बनवून ते माझ्या मंगळसूत्रात घालण्यास सांगितले . हे नवग्रहांच्या नियंत्रणासाठी होते . आमच्या भावविश्वातून आता नूतन नवग्रह बाहेर पडतील . 
            स्वामींनी राधेविषयी सांगितलेल्या गोष्टींची तुलना माझ्या जीवनाशी करण्यास सांगितले . माझी सर्व कर्मे स्वामींशी योग या एकाच ध्येयाप्रीत्यर्थ आहेत . मी इतरांच्या प्रेमाविषयी विचार करत नाही . मी केवळ स्वामींच्या विचारात असते . तेथे अन्य कोणालाही स्थान नाही . हे केवळ स्वामींप्रति असणारे विशुद्ध , पवित्र प्रेम आहे . मनुष्याप्रमाणे तेथे पूर्वसंस्कारांची बीजे नाहीत . मनुष्य जन्मानुजन्म ' मी आणि माझे ' यांची बीजे गोळा करतो . हे दूर केलेच पाहिजे . 
           पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू आता पुरे ! जागे व्हा . तुमच्या परिवर्तनासाठी स्वामींची कृपा प्रतिज्ञा करत आहे . पूर्वीच्या कोणत्याही युगाला स्वामीरूप अहोभाग्य लाभलेले नाही . अशी ही दुर्मिळ संधी हातातून निसटू देऊ नका . 

जय साई राम 

व्ही.एस.
             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा