रविवार, २५ मे, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" बंध वा मुक्ती दोन्हीसाठी केवळ भाव जबाबदार असतात ".

पुष्प २० पुढे सुरु 

            काही दिवसांपूर्वी स्वामींनी गंगादेवीचे चित्र देऊन लिहिले , ' नद्यांमध्ये मी गंगा आहे . अहम्  वसंतास्मि ' सर्वकाही त्यांनीच लिहिले व म्हणाले , " तू अमृत कलशासहित भूतलावर येऊन कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करत आहेस . अमृत कलश वैश्विक पापसंहार करत आहे ". गंगेच्या प्रवाहाप्रमाणे वाहत माझे अश्रू हे कार्य करतात . माझ्या अखंड वाहणाऱ्या अश्रूंचा प्रत्येक थेंब , प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील संचित पापाच्या पर्वतांचा विनाश करत आहे . 
 हे गंगे , 
               वाहू लागता तुझा पवित्र अखंडित जलप्रवाह 
               सुस्नात होऊनी जाहले परिपूर्ण निर्मल 
               हे अखिल विश्व . 
               क्रौर्य यमदूतांचे अन् यमराजाचे ही , 
               जाहले दिसेनासे कायमचे .
               हृदयी विश्वप्रेम लेवून 
               तेजोमय देहासवे सकलांनी
               फुलविले जीवन प्रेममय .
            तिसरा चरण जसा आहे तसा समर्पक आहे . ह्या ऋषींना स्वामींच्या अवताराविषयीचे ज्ञान कसे बरं होते ? ज्ञान चक्षूनद्वारा ते हे सर्व जाणत होते . स्वामींनी मला सांगितले की , महाविष्णूंच्या पादकमलांपासून उगम पावणारी मी गंगा आहे . आम्ही दोघं ह्या विश्वाचे वैकुंठात परिवर्तन करण्यासाठी इथे आलो आहोत . ही वसंतगंगा स्वामींच्या चरणांपासून उगम पावली . त्यावेळी , स्वामी श्री सत्य साई अवतारात इथे होते . म्हणून तिच्या हातांमध्ये सदैव स्वामींचे चरण असतात . तिने स्वामींकडे वैश्विक मुक्तीचे वरदान मागितले . जेथे सर्व जीवनमुक्त असतील . यम त्याच्या दूतांसह या जगातून कायमचे हद्दपार होतील . इथे कुणालाही मृत्यू येणार नाही ; इथे केवळ अमरत्व असेल . मृत्यू रहित जीवन. स्वामी अन् मी सर्वांची पापे आमच्या देहांवर घेऊन आम्ही दोघं क्लेश भोगत आहोत . सत्ययुगात संपूर्ण मानवजात तेजोमय देह धारण करून प्रेममय जीवन जगेल . एक हजार वर्षांसाठी इथे यमाचे भय नसेल. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात

जय साई राम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा