सोमवार, ३० जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

       " तुमच्या कर्णेनद्रियानी केवळ परमेश्वराविषयी श्रवण केले पाहिजे , अन्य काही नाही ". 


वसंतामृतमाला
पुष्प २२ 
बदमाश ' मी

                 ' पराभक्ती ' या पुस्तकातील ४१ क्रमांकाच्या पानावरील एका उताऱ्याला स्वामींनी कंस केला . परमेश्वराच्या सर्व व्यापकत्वावर गोपगोपिकांची अशी श्रद्धा होती की ते कोठेही गेले तरी ' ते ' एकमेव द्वितीय सत्य वेगवेगळी रूपे धारण करत असे . प्रभू परमेश्वर सर्वत्र , सर्व ठिकाणी विद्यमान आहे . यावर त्यांचा विश्वास होता . जेव्हा ते पाणी पिण्यासाठी तळ्यावर जात तेव्हा कृष्णास पाहात . मत्सरी लोकांनी त्यांना दुधामध्ये विष घालून दिले , त्यातही त्यांना कृष्णच दिसला . ते कृष्णाच्याच विचारात होते . जर आपल्या हृदयात कृष्ण नसेल तर आपण त्याला पाहू शकणार नाही जरी तो प्रत्यक्षात समोर आला तरीही नाही . परंतु जर तो आपल्या हृदयात प्रस्थापित असेल तर आपण त्याला सर्वत्र पाहू शकतो . 
           अशिक्षित गोपगोपीना परमेश्वराचे सर्व व्यापकत्व ज्ञात होते . ते कृष्णास सर्वत्र पाहात . जलाशयातील पाण्यामध्ये त्यांना कृष्ण दिसे . मत्सरग्रस्त लोकांनी दिलेल्या विषमय दुधाच्या प्यालातही त्यांनी कृष्ण पाहिला . अगदी असेच प्रल्हादही परमेश्वराला सर्वत्र पाहात असे . प्रभू सदैव त्यांच्या हृदयात वसण्याचे काय कारण असेल ? जो परमेश्वराला आपल्या हृदयात प्रस्थापित करतो तो सर्वत्र परमेश्वर पाहतो . ही मनोवस्था सर्व संत महात्म्यांची आहे . साधनेद्वारे त्यांनी अंतरंगातील परमेश्वर पाहिला व नंतर सर्व व्याप्त प्रभू बाहेर पाहिला . परमेश्वर नाही असे कोणतेही स्थान नाही . सर्वांना व्यापून उरलेले  केवळ एक व एकच सत्य आहे . हे आहे , ' एकोहम् बहुस्यामी ' . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात

जय साई राम  

रविवार, २९ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

       " तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे , अन्य काही नाही ". 

पुष्प २१ पुढे सुरु

              दैवी आनंद कसा असतो ? मानव तो समजू शकणार नाही . तांदुळाच्या पीठाचे बनवलेले दुध प्यायल्यामुळे अश्वत्थामाला खऱ्या दुधाची चव माहित नव्हती . त्याचप्रमाणे जगाचा स्वाद घेण्यामध्ये रमलेल्या माणसांना परमेश्वराचा स्वाद माहीत नाही . त्यांनी खरा स्वाद चाखलाच नाहीय . स्वामी व मी सर्वांना परमेश्वराचा स्वाद चाखविण्यासाठी अन्  सर्वांना जीवनमुक्त करण्यासाठी येथे आलो आहोत . म्हणून यावेळी मनुष्याने ज्ञान प्राप्ती करून ते स्पष्टपणे समजून घेतलेच पाहिजे . पुरे आता ! या मायेतून जागे व्हा . 
            काल हा अध्याय लिहून संपल्यानंतर साईप्रियाने एक छोटेसे पाकीट आणले . त्यात मोहरीच्या आकाराचे पाच चमकते मणी होते .
६ मे २०१३ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी , तुम्ही काल दिलेले ५ मणी म्हणजे काय ? 
स्वामी - तू पंचेंद्रियांवर विजय मिळवून पंचतत्वे नियंत्रणात आणलीस . त्यांचे लघुरूप करून हे मणी मी तुला दिले . आभूषण करून तू ते गळ्यात घाल . 
वसंता - आता मला समजले . परंतु तो मधासारखा रंग काय सुचवतो ? 
स्वामी - तू सर्वांना अमृत समान बनवितेस . 
ध्यान समाप्ती 
            आता आपण पाहू या . कालच्या अध्यायात मी पंचेंद्रियांना आभूषण म्हणून कसे गळ्यात घातले ते लिहिले . यासाठी स्वामींनी आता मला ५ छोटे मणी दिले . ही पंचेंद्रिये अत्यंत शक्तिशाली असून ती मानवाला गुलाम बनवितात . पंचतत्वेही अत्यंत बलवान असून त्यांच्यामध्ये जगाचा संहार करण्याचे सामर्थ्य असते . मी त्या दोन्हीवर नियंत्रण ठेऊन त्यांच्यावर विजय मिळवला . म्हणून मी पंचतत्वे आभूषणासम गळ्यात घालते . हे दर्शविण्यासाठी स्वामींनी आता मला छोटे मणी दिले . मी पंचेंद्रिये व पंचतत्वांवर ताबा मिळविल्यामुळे ते अमृतमणी झाले .

जय साई राम 

व्ही. एस.  
           
            
             

गुरुवार, २६ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

    " तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे , अन्य कशालाही नाही  ". 

पुष्प २१ पुढे सुरु 

           मानवी देहास नऊ द्वारे असल्यामुळे स्वामी त्याची तुलना मुरलीशी करतात . स्वतःला रिक्त केल्यानंतर आपण पोकळ मुरलीसारखे बनू मग परमेश्वर आपल्या देहरूपी मुरलीमधून मधूर संगीताची धुन वाजवेल . पूर्वी मी हे एका गीतामध्ये लिहिले आहे . 
नऊ द्वारे असती या देहास 
चुकता एक ठोका काळजाचा 
रुपांतर होई देहाचे कलेवरात 
           एकदा व्यक्ति मन , बुद्धी , अहंकार , इंद्रिये या सर्वांचा त्याग करून स्वतःला रिक्त करते तेव्हा ती परमेश्वराच्या हातातील पोकळ मुरली बनते . माझ्यामध्ये भौतिकता नाही . जन्मल्यापासून मी परमेश्वरासाठी तळमळते आहे . अश्रू ढाळते आहे . माझ्याकडे परमेश्वरा व्यतिरिक्त काही नाही . अखेरच्या क्षणी राधेने कृष्णाच्या मांडीवर डोके ठेऊन त्याचे मुरलीवादन ऐकत देह त्यागला . त्यानंतर कृष्णाने पुन्हा कधीही मुरलीला स्पर्श केला नाही. स्वामींनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की , ' तत्वमसि ' हे सत्य राधेने प्रस्थापित केले . तथापि या कार्याची सखोलता सामान्य जगाला समजू शकत नाही . अखिल जगात परमेश्वर आहे . सर्वांमध्ये केवळ दिव्यत्व वास करते . युग परिवर्तनाद्वारे स्वामी व मी हे दर्शवितो . हे दर्शविण्यासाठीच स्वामींनी मला , या ' मी ' विना ' मी ' ला येथे आणले . संपूर्ण जग माझ्यासारखे बनविण्यासाठी वसंतमयम्  करण्यासाठी मी कठोर तप केले . वसंतमयम्  मध्ये सर्वांची मनोवस्था माझ्यासारखी , 'मी ' विना ' मी ' अशी असेल . सर्वजण रिक्त मुरली सारखे असतील . ' तत्वमसि ' चे प्रात्यक्षिक हेच स्वामींचे अवतार कार्य आहे . स्वामी व मी अखिल विश्वामध्ये हे सत्य प्रस्थापित करत आहोत . ही नवनिर्मिती आहे . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........

जय साई राम
   
   

रविवार, २२ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

" शांती अंतर्यामी आहे . हे जाणणे हेच खरे आहे ! "

पुष्प २१ पुढे सुरु

            चमत्कार मायेमध्ये किती लोक फसले . याविषयी स्वामींनी मला लिहिण्यास सांगितले . स्वानुभवांच्या आधारे मी ते दोन भागात लिहिले . याद्वारे लोकांना अध्यात्मिक मायेची माहिती होऊ शकते . मनुष्य आधीच भौतिक मायेमध्ये गुरफटला आहे . त्यातच कोणीतरी येतो आणि चमत्कार मायेचे जाळे पसरतो . त्याने लोक अधिक गोंधळून जातात , चमत्कार माया पकड घेते . भौतिक जीवनातील दुःखाने त्रस्त माणूस निवारणाचे उपाय शोधात असतो . तथापि या प्रयत्नात तो दुःखाच्या नव्या जाळ्यात अडकतो ! परमेश्वर एवढ्या सहजतेने प्राप्त होत नाही . भौतिक गोष्टींसाठी महत्  प्रयास करत तुम्ही अश्रू ढाळता ! हेच प्रयत्न तुम्ही परमेश्वराचा शोध घेण्यासाठी खर्ची घाला . जगाऐवजी परमेश्वरासाठी अश्रू ढाळा .
            स्वामींनी ४६ पानावरील काही मजकुरालाही कंस केला व ' महत्वाचे ' असे लिहिले . 
            " राधा आणि मुरली यांच्यामधील निकट नाते ओळखणे अत्यंत आवश्यक आहे . मानवी देहाला नऊ द्वारे तर मुरलीलाही नऊ छिद्रे असतात . राधा मुरलीसमान होती , अशी मुरली की जिच्यामध्ये भौतिकतेला स्थानच नव्हते . ती सर्व भौतिक संकल्पनांच्या पलीकडे होती . अशी ही राधा मुरलीतून प्रकट झाली आणि पुन्हा मुरलीमध्ये विलीन झाली . इथे मुरली म्हणजे देह.  श्वास उच्छवास हे परमेश्वरी संकल्पाचे प्रतिक आहे . हंस गायत्रीच्या उच्चारानुसार याला ' सोहम्  ' असेही म्हणतात . ' सोहम् ' मंत्र आपल्याला ' मी ते आहे ' , ' मी ते आहे ' याचे स्मरण करून देतो . ' तत्वमसि ' या संज्ञे तूनही ते वर्णन केले आहे . प्रत्येकजण दिव्य स्वरूप आहे .हे सत्य देहधारी राधा स्थापित करत  आहे ". 

उर्वरित वसंतामृत पुढील  भागात ........ 

जय साई राम
             
                  

गुरुवार, १९ जून, २०१४

ॐ श्री साई वसंत साई साय नमः 

सुविचार

" निर्मल हृदयामधून सत्य प्रकाशमान होते ".

पुष्प २१ पुढे सुरु 

              आता प्रकृती माझे रूप घेऊन आली . निर्मितीची असंख्य रूपे दर्शविणाऱ्या प्रकृतीची दूत बनून मी आले . मी अत्यंत साधे न/ आदर्श जीवन व्यतीत करत आहे . मी माझ्या जीवनात नवविधा भक्ती मार्गाचे आचरण केले , अन/ माझ्या जीवन शैलीद्वारे गीतेतील १८ अध्यायांचे प्रात्यक्षिक केले . मी सर्व उपनिषदांनी सांगितल्यानुसार जीवन जगत आहे . मी ब्रम्हसुत्रावरही विवरण करून माझ्या जीवनात त्याचे प्रात्यक्षिक केले . माझे जीवन प्रेमसूत्र , आनंद सूत्र व शांती सूत्र यांचे जिवंत उदाहरण आहे . ही सर्व सूत्रे मी माझ्या जीवनाद्वारे विषद केली . माझी जीवन शैली या सर्वांचेच प्रात्यक्षिक आहे . मानवामध्ये कार्यरत भावविश्वाद्वारे एक जीवात्मा परमात्मा कसा होतो हे मी दाखवून दिले . माझ्या १२० हून अधिक पुस्तकांमधून मानवाला परमेश्वर प्राप्तीचे शेकडो मार्ग मी सांगितले . जो तो आपापल्या स्वभावानुसार परमेश्वर प्राप्तीच्या कोणत्याही मार्गाची निवड करून भगवत प्राप्ती करू शकतो . योगसुत्राचे आचरण माझ्या जीवनात मी कसे केले ते मी लेखनात बद्ध केले आहे . परमेश्वर प्राप्तीसाठी मी जन्मल्यापासून केलेले प्रयास , किती वैविध्यपूर्ण मार्गांनी परमेश्वर प्राप्ती होऊ शकते अशा सर्व विषयांची माहिती माझ्या पुस्तकातून होऊ शकते . कर्म म्हणजे काय , कर्माचे विविध प्रकार आणि स्वप्रयत्नांनी संहार कसा करावा या विषयी मी तपशीलवार लिहिले आहे . मी अनेक कठोर व्रतवैकल्ये केली ,  प्रतिज्ञा केल्या व ७३ वर्षे परमेश्वरासाठी अश्रू ढाळले . एवढ्या सगळ्या अथक प्रयत्नानंतर प्रतिसाद म्हणून त्यांनी मला माझ्यावरील त्यांचे प्रेम व्यक्त केले . एवढे महाप्रयास केल्यानंतरच परमेश्वर आपल्या साधनेला प्रतिसाद देतो . परमेश्वर व साधक यांमधील संबंध आपण जाणून घ्यायला हवा . ' इथेच ! या क्षणी !!मुक्ती !!! ' या माझ्या पहिल्या पुस्तकात ' प्रयत्न आणि कृपा ' नावाचा एक अध्याय लिहिला आहे . आपल्या प्रयत्नांच्या प्रमाणातच आपल्याला परमेश्वरी कृपा प्राप्त होत असते . स्वामी आणि मी सुद्धा हेच उघड करीत आहोत . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........

जय साई राम

रविवार, १५ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो ". 

वसंतामृतमाला 

पुष्प २१ 
प्रयत्न आणि प्रतिसाद 

              प्रेमभक्त या पुस्तकातील ६८ पानावरील महत्वाचा मजकूर स्वामींनी सूचित केला .
                      ...... दिव्यत्वाचे विविध पैलू व्यक्त करण्याकरिता व मानवाचा परमेश्वराशी योग घडविण्यास , सृष्टीचा निर्माता , परमात्मा श्रीकृष्ण  मानवी रूप धारण करून आला आहे . धारा , प्रकृतीने राधेचे रूप घेतले , हे निर्मितीचे प्रतिक आहे . म्हणून आपण राधेला निर्मिती मधील सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची प्रतिकात्मक दूत मानले पाहिजे . परमात्म्याचे दिव्य स्वरूप भगवान श्रीकृष्णा पर्यंत पोहोचण्यासाठी ती लोकांसमोर अनेक आदर्श उदाहरणे प्रस्तुत करत आहे . हे सर्व पाहता , राधेचे प्रयत्न आणि त्याला मिळणारा श्रीकृष्णाचा प्रतिसाद यांच्यातील जिवाभावाचे नाते ओळखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे . 
              प्रत्येकामध्ये परमेश्वरी अंश आहे , सर्वांमध्ये दिव्यत्व विद्यमान आहे . भगवान श्रीकृष्ण लोकांना हे दर्शवण्यासाठी व त्यांना परमेश्वराशी संयुक्त करून घेण्यासाठी आला होता . राधा प्रकृती होय . हे पुढे चालू ठेवण्यासाठी स्वामी अवतरले . कृष्णाने हे अत्यंत अल्प प्रमाणात दर्शविले . त्याने दुर्जनांचा नाश करून धर्मसंस्थापना केली , तथापि मानवजातीचा परमेश्वराशी योग घडविला नाही , मात्र गोकुळातील गोपगोपीनसाठी त्याने हे केले . अशिक्षित गोपगीपीना मुमुक्षू अवस्था प्राप्त झाली . ते सदैव दिव्यानंदात मग्न असत . त्यांच्या कृष्णप्रेमामुळे त्यांना हे सध्या झाले . 
               कलियुग परमेश्वरामध्ये विलीन करण्यासाठी स्वामी येथे आले . कलियुगाचा योग होईल . हा महामहिम अवतार येथे आला , त्याने ८४ वर्षे उपदेश केला , तथापि मानवजात कर्माने बध्द असल्यामुळे तो उपदेश व्यर्थ गेला . ते स्वप्रयत्नाने स्वतःमध्ये परिवर्तन घडवतील अशी कोणतीही शक्यता दिसत नसल्यामुळे स्वामी व मी इथे आलो . आम्ही सर्व वैश्विक कर्मे आमच्या अंगावर घेतील . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......

जय साई राम      

गुरुवार, १२ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" परमेश्वर सत्यस्वरूप आहे ". 

पुष्प २० पुढे सुरु 

१५ जून २००३ 
            आज स्वामींनी माझ्या हस्ताक्षरातील ४ ओळींची कविता दिली . ती अशी .....
            हे महासागर , करुणासागरा 
            हे करुणाधना , प्रभू ! 
            वैश्विक मुक्ती एक जलबिंदू या महासागरातील 
            या अथांग महासागरासी , कोण जाणू शकेल ? 
                  स्वामींचे हे लिखाण जणूकाही मीच लिहित होते . माझे प्रभू ! तुमच्या करुणेचा एक बिंदू म्हणजे तुमच्या कारुण्याच्या महासागरातील केवळ एक थेंब ! मी विषद करते आहे . वर्णन करते आहे .माझ्या १२० हून अधिक पुस्तकांमधून मी हेच वर्णन करून सांगितले आहे . मी हजारो गीते व काव्येसुद्धा केली . ऋषि , सिद्ध पुरुष , देव वा ज्ञानी कोणीही या करुणेचे परिमाण जाणू शकत नाही ! कोण जाणणार ? अशा परिस्थितीत ही ' मी ' विना ' मी ' कसे काय जगू शकेल ? 
            महाअवताराचा जयजयकार ! 
            त्याच्या अवतारकार्याचा जयजयकार ! 
            त्याच्या कारुण्यातील एका बिंदूचा जयजयकार!
                  हे पुस्तक सत्संगात वाचण्याअगोदर नेहमीच्या सवयीने एडीने आमचा e.mail account पाहिला . त्यामध्ये एक बातमी होती ती अशी , " गंगेने आणिले शिवास भूतली ! " त्या सोबत भगवान शिवाचे एक चित्र होते . त्या चित्रात भगवान गंगेच्या प्रक्षुब्ध प्रवाहात मध्यभागी बसले होते . या अध्यायासाठी किती धक्कादायक पुरावा ! स्वामी , कृपा करून तुम्ही पुन्हा भूतलावर परत या आणि तुमच्या करुणेचा एक थेंब दाखवा . 



जय साई राम 

व्ही. एस.



रविवार, ८ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " माया सत्यावर आवरण घालते . एकोहम्  बहुस्यामी ( एकातून अनेकत्व ) हे सत्य जाणून घ्या ".

पुष्प २० पुढे सुरु 


हे परम पवित्र गंगे , 
                        गतकालीन सत् कृत्यांनी 
                        दिधले दान मज 
                        विश्वनाथाच्या आशीशांचे  अन ......
                        भवदुःख विनाशक ज्ञानाचे .
                 ह्या कलियुगातील लोक अत्यंत भाग्यवान आहेत , कारण साक्षात् विश्वनाथ भूतलावर अवतरला आहे . तो अखिल विश्वाचा नाथ , आदिपुरुष आहे . तो करुणाधन मानवी रूप धारण करून अवतरला , त्याने ८४ वर्षे अखिल विश्वावर कृपाशिर्वादांचा वर्षाव केला. स्वामींनी सर्वांची पापकर्मे स्वतःच्या  अंगावर घेतली व नंतर देहत्याग केला . आता ते नूतन देह धारण करून कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करतील .              
             मला स्वामींनी मानवी जीवनातील भवदुःखांचा विनाश करण्याचे ज्ञान उघड करून सांगितले . हे ज्ञान मी पुस्तकांमध्ये लेखनबद्ध करते . ते करुणासागर ,  ज्ञानसागर व सत्यसागर आहेत . केवळ या भगवत्  अवतारानेच अशा रितीने कृपावर्षाव केला. हे दर्शविण्यासाठीच ही वसंतगंगा महाविष्णूंच्या चरणांमधून भूतलावर आली . परंतु पृथ्वीला तिचा वेग सहन करणे शक्य नसल्याने महाशिवाने तिला आपल्या मस्तकी धारण करून एक छोटासा जलौध भूतलावर प्रवाहित केला. हा महाप्रभू ह्याचेच निर्देशन करतो . त्याने त्याच्या कारुण्याने वैश्विक पापकर्मे स्वीकारली त्याची शिरोधारी गंगा - मी इथे आले . मी कठोर तप करत जागतिक पापकर्मे माझ्या अंगावर घेतली . माझ्या तपाचे फळ सर्वांना मिळेल . सर्व अमृतपान करतील , जीवन्मुक्त अवस्था अनुभवतील . ही या गंगेची कथा आहे . ह्या महाअवताराचे माहात्म्य कोण लिहू शकणार ?        
       
उर्वरित वसंतामृत पुढील भागात  ........

जय साई राम


                                   

गुरुवार, ५ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " मनुष्याने त्याचे भाव , विचार आणि विवेक आध्यात्मिक ध्येयावर केंद्रित केल्यास त्याला ज्ञान प्राप्त होते ". 

पुष्प  २० पुढे सुरु

            प्रेमसूत्र लिहित असताना स्वामी स्वतः म्हणाले , " आता हे प्रेमसूत्र लेखन पुरे कर . नाही मला हे सहन होत ! " स्वामी भगवान ब्रह्मा , विष्णू , महेश या  त्रिमूर्तींचे स्वरूप आहेत . अखिल देवदेवता या एका रुपामध्ये समाविष्ट आहेत . असे असूनही माझ्या लिखाणातील प्रेमाचा आवेग असह्य होऊन त्यांनी मला सांगितले , " पुरे ! थांबव लिखाण ! " म्हणून मी म्हणते की मी कोण आहे हे कोणालाही सांगता येणार नाही . 
     हे गंगे , 
                तुझी प्रार्थना , तुला दंडवत 
                तव नामांचे ध्यान करिता 
                होऊनी पापविनाश 
                परमशांती लाभे चित्ता 
                दिव्यानंद रूपिणी देसी कृपाशिर्वाद भक्तांसी 
    हे देवी , 
                असहाय्यासी तू सहायक 
                सर्वेश्वरी तू भक्तसंरक्षक 
                संथ वाहतेस गंगामाई 
                कृपाछत्र ठेव तू माझे शिरी . 
          याची तुलना , स्वामींनी मला दिलेल्या , ' ॐ श्री साई वसंत साई साय नमः ' या मंत्राशी करता येईल . ह्या मंत्राने भक्तांच्या समस्या व व्याधींचे निराकरण होऊन त्यांना परमशांती लाभते . सर्वांचा पापसंहार होतो . अनेकानेक यामुळे लाभान्वित झाले आहेत . हा मंत्र स्वामींना व मला जोडतो . स्वामींनी मला १०८ नामे दिली , त्यातसुद्धा आमचा योग व्यक्त झाला आहे . हा मंत्र देह , मन व आत्मा हे मानवाचे त्रिविध ताप , म्हणजे जन्म या व्याधीचे निवारण करतो . हा मंत्र सत्ययुगाचे बीज आहे . माझ्या कठोर तपाने प्रसन्न होऊन स्वामींनी हा मंत्र दिला .  ह्या मंत्राद्वारे पापसंहार होऊन मानवजात आनंदास प्राप्त होईल . काही नामे स्वामींच्या देहाच्या विविध अंगांशी संबंधित आहेत . यावरून हे लक्षात येते की मी स्वामींपासून वेगळी नसून स्वामींमध्ये ' एक ' झाले आहे . म्हणून मला हे सर्व शक्य आहे . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम

रविवार, १ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " विनयशीलता , निरहंकारी मन आणि अढळ श्रद्धा या गुणांसहित मार्गक्रमण करणाऱ्यास निश्चित यशप्राप्ती होते ". 

पुष्प २० पुढे सुरु 

           स्वामींनीच माझ्याशी विवाह केला . मी त्यांच्या अवतार नाट्यामध्ये माझी भूमिका करण्यासाठी येथे आले . त्यांनी मला नानाविध शक्ती प्रदान केल्या परंतु मी त्या सर्वांचा अव्हेर केला . ' जलौध अन्  सरिता अनेक ' याचा अर्थ हा आहे . या शक्ती पर्वतांप्रमाणे महाकाय होत्या . ही सर्व कलीची पापकर्मे होत . मी वैश्विक कर्मे माझ्या देहावर स्विकारली व सर्वांच्या पल्याड गेले . याचे कारण माझा देह कपूर आहे . कर्पुरासारखी मी माझे स्वत्व वितळवते , काहीही शेष न ठेवता जगाला प्रकाश देते . या जगात जन्म घेऊन मी वैश्विक मुक्तीसाठी तप करत आहे . अखेरीस माझी काया ज्योतीस्वरूप होऊन स्वामींच्या देहात विलीन होईल . हे कपूराशी तुलनात्मक आहे . हा वसंतकर्पूर परमेश्वरापासून जन्म  घेतो , त्याच्यासाठीच जीवन जगतो अन् स्वतःस परमेश्वराला समर्पित करतो . काल , स्वामींनी मला दिलेल्या केळ्यावर ' कापूर ' हा शब्द लिहिला .
                      हे गंगादेवी , 
                               ना वर्णू शकती महिमा तुझा 
                     ब्रम्हा विष्णू महेशही 
                               पडती उणे शब्दही , 
                     वेद करिती सायास 
                               थोरवी तुझी गाण्यास 
                     कार्य अत्यंत क्लिष्ट हे 
                               म्हणुनी कथन करिती 
                    ' नेती ' , ' नेती ' 
            ' मी ' विना ' मी ' ही माझी अवस्था आहे . या अवस्थेचे वर्णन कसे करणार ? स्वामींनी याचे १४ वेगवेगळ्या अंगानी स्पष्टीकरण केले आहे . कोणी मला स्त्री म्हणून पाहिले आणि म्हणाले , ' राधा, कृष्ण , वैश्विक गर्भ ' . वास्तविक पाहता मी स्वामींची शक्ती म्हणजे केवळ भाव स्वरूप आहे . तथापि सर्वांना वाटते की मी हा देह आहे . मी देह नाही . माझ्या अंतिम क्षणी या देहाचे ज्योतीमध्ये रुपांतर करून मी हे सिद्ध करीन . मी मन आहे कां ? जर मी मन असेन तर क्षणोक्षणी सागर लहरींसारख्या विचारांच्या हजारो लाटा येत राहतील . माझ्याबाबतीत असं नाहीय . माझ्या मनात गेली ७३ वर्षे केवळ एक विचार आहे . स्वामींचा विचार . मी ' मी ' ( अहं ) आहे कां ? मला ' मी ' ( अहंभाव ) नाही . मला ' मी व माझे ' हे भाव नाहीत . कोणीही माझी अवस्था वर्णन करू शकत नाही . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम