ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" माया सत्यावर आवरण घालते . एकोहम् बहुस्यामी ( एकातून अनेकत्व ) हे सत्य जाणून घ्या ".
पुष्प २० पुढे सुरु
हे परम पवित्र गंगे ,
गतकालीन सत् कृत्यांनी
दिधले दान मज
विश्वनाथाच्या आशीशांचे अन ......
भवदुःख विनाशक ज्ञानाचे .
ह्या कलियुगातील लोक अत्यंत भाग्यवान आहेत , कारण साक्षात् विश्वनाथ भूतलावर अवतरला आहे . तो अखिल विश्वाचा नाथ , आदिपुरुष आहे . तो करुणाधन मानवी रूप धारण करून अवतरला , त्याने ८४ वर्षे अखिल विश्वावर कृपाशिर्वादांचा वर्षाव केला. स्वामींनी सर्वांची पापकर्मे स्वतःच्या अंगावर घेतली व नंतर देहत्याग केला . आता ते नूतन देह धारण करून कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करतील .
मला स्वामींनी मानवी जीवनातील भवदुःखांचा विनाश करण्याचे ज्ञान उघड करून सांगितले . हे ज्ञान मी पुस्तकांमध्ये लेखनबद्ध करते . ते करुणासागर , ज्ञानसागर व सत्यसागर आहेत . केवळ या भगवत् अवतारानेच अशा रितीने कृपावर्षाव केला. हे दर्शविण्यासाठीच ही वसंतगंगा महाविष्णूंच्या चरणांमधून भूतलावर आली . परंतु पृथ्वीला तिचा वेग सहन करणे शक्य नसल्याने महाशिवाने तिला आपल्या मस्तकी धारण करून एक छोटासा जलौध भूतलावर प्रवाहित केला. हा महाप्रभू ह्याचेच निर्देशन करतो . त्याने त्याच्या कारुण्याने वैश्विक पापकर्मे स्वीकारली त्याची शिरोधारी गंगा - मी इथे आले . मी कठोर तप करत जागतिक पापकर्मे माझ्या अंगावर घेतली . माझ्या तपाचे फळ सर्वांना मिळेल . सर्व अमृतपान करतील , जीवन्मुक्त अवस्था अनुभवतील . ही या गंगेची कथा आहे . ह्या महाअवताराचे माहात्म्य कोण लिहू शकणार ?
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा