ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो ".
वसंतामृतमाला
पुष्प २१
प्रयत्न आणि प्रतिसाद
...... दिव्यत्वाचे विविध पैलू व्यक्त करण्याकरिता व मानवाचा परमेश्वराशी योग घडविण्यास , सृष्टीचा निर्माता , परमात्मा श्रीकृष्ण मानवी रूप धारण करून आला आहे . धारा , प्रकृतीने राधेचे रूप घेतले , हे निर्मितीचे प्रतिक आहे . म्हणून आपण राधेला निर्मिती मधील सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची प्रतिकात्मक दूत मानले पाहिजे . परमात्म्याचे दिव्य स्वरूप भगवान श्रीकृष्णा पर्यंत पोहोचण्यासाठी ती लोकांसमोर अनेक आदर्श उदाहरणे प्रस्तुत करत आहे . हे सर्व पाहता , राधेचे प्रयत्न आणि त्याला मिळणारा श्रीकृष्णाचा प्रतिसाद यांच्यातील जिवाभावाचे नाते ओळखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे .
प्रत्येकामध्ये परमेश्वरी अंश आहे , सर्वांमध्ये दिव्यत्व विद्यमान आहे . भगवान श्रीकृष्ण लोकांना हे दर्शवण्यासाठी व त्यांना परमेश्वराशी संयुक्त करून घेण्यासाठी आला होता . राधा प्रकृती होय . हे पुढे चालू ठेवण्यासाठी स्वामी अवतरले . कृष्णाने हे अत्यंत अल्प प्रमाणात दर्शविले . त्याने दुर्जनांचा नाश करून धर्मसंस्थापना केली , तथापि मानवजातीचा परमेश्वराशी योग घडविला नाही , मात्र गोकुळातील गोपगोपीनसाठी त्याने हे केले . अशिक्षित गोपगीपीना मुमुक्षू अवस्था प्राप्त झाली . ते सदैव दिव्यानंदात मग्न असत . त्यांच्या कृष्णप्रेमामुळे त्यांना हे सध्या झाले .
कलियुग परमेश्वरामध्ये विलीन करण्यासाठी स्वामी येथे आले . कलियुगाचा योग होईल . हा महामहिम अवतार येथे आला , त्याने ८४ वर्षे उपदेश केला , तथापि मानवजात कर्माने बध्द असल्यामुळे तो उपदेश व्यर्थ गेला . ते स्वप्रयत्नाने स्वतःमध्ये परिवर्तन घडवतील अशी कोणतीही शक्यता दिसत नसल्यामुळे स्वामी व मी इथे आलो . आम्ही सर्व वैश्विक कर्मे आमच्या अंगावर घेतील .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा