ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" शांती अंतर्यामी आहे . हे जाणणे हेच खरे आहे ! "
पुष्प २१ पुढे सुरु
स्वामींनी ४६ पानावरील काही मजकुरालाही कंस केला व ' महत्वाचे ' असे लिहिले .
" राधा आणि मुरली यांच्यामधील निकट नाते ओळखणे अत्यंत आवश्यक आहे . मानवी देहाला नऊ द्वारे तर मुरलीलाही नऊ छिद्रे असतात . राधा मुरलीसमान होती , अशी मुरली की जिच्यामध्ये भौतिकतेला स्थानच नव्हते . ती सर्व भौतिक संकल्पनांच्या पलीकडे होती . अशी ही राधा मुरलीतून प्रकट झाली आणि पुन्हा मुरलीमध्ये विलीन झाली . इथे मुरली म्हणजे देह. श्वास उच्छवास हे परमेश्वरी संकल्पाचे प्रतिक आहे . हंस गायत्रीच्या उच्चारानुसार याला ' सोहम् ' असेही म्हणतात . ' सोहम् ' मंत्र आपल्याला ' मी ते आहे ' , ' मी ते आहे ' याचे स्मरण करून देतो . ' तत्वमसि ' या संज्ञे तूनही ते वर्णन केले आहे . प्रत्येकजण दिव्य स्वरूप आहे .हे सत्य देहधारी राधा स्थापित करत आहे ".
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा