ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे , अन्य कशालाही नाही ".
पुष्प २१ पुढे सुरु
नऊ द्वारे असती या देहास
चुकता एक ठोका काळजाचा
रुपांतर होई देहाचे कलेवरात
एकदा व्यक्ति मन , बुद्धी , अहंकार , इंद्रिये या सर्वांचा त्याग करून स्वतःला रिक्त करते तेव्हा ती परमेश्वराच्या हातातील पोकळ मुरली बनते . माझ्यामध्ये भौतिकता नाही . जन्मल्यापासून मी परमेश्वरासाठी तळमळते आहे . अश्रू ढाळते आहे . माझ्याकडे परमेश्वरा व्यतिरिक्त काही नाही . अखेरच्या क्षणी राधेने कृष्णाच्या मांडीवर डोके ठेऊन त्याचे मुरलीवादन ऐकत देह त्यागला . त्यानंतर कृष्णाने पुन्हा कधीही मुरलीला स्पर्श केला नाही. स्वामींनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की , ' तत्वमसि ' हे सत्य राधेने प्रस्थापित केले . तथापि या कार्याची सखोलता सामान्य जगाला समजू शकत नाही . अखिल जगात परमेश्वर आहे . सर्वांमध्ये केवळ दिव्यत्व वास करते . युग परिवर्तनाद्वारे स्वामी व मी हे दर्शवितो . हे दर्शविण्यासाठीच स्वामींनी मला , या ' मी ' विना ' मी ' ला येथे आणले . संपूर्ण जग माझ्यासारखे बनविण्यासाठी वसंतमयम् करण्यासाठी मी कठोर तप केले . वसंतमयम् मध्ये सर्वांची मनोवस्था माझ्यासारखी , 'मी ' विना ' मी ' अशी असेल . सर्वजण रिक्त मुरली सारखे असतील . ' तत्वमसि ' चे प्रात्यक्षिक हेच स्वामींचे अवतार कार्य आहे . स्वामी व मी अखिल विश्वामध्ये हे सत्य प्रस्थापित करत आहोत . ही नवनिर्मिती आहे .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा