ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्याने त्याचे भाव , विचार आणि विवेक आध्यात्मिक ध्येयावर केंद्रित केल्यास त्याला ज्ञान प्राप्त होते ".
पुष्प २० पुढे सुरु
हे गंगे ,
तुझी प्रार्थना , तुला दंडवत
तव नामांचे ध्यान करिता
होऊनी पापविनाश
परमशांती लाभे चित्ता
दिव्यानंद रूपिणी देसी कृपाशिर्वाद भक्तांसी
हे देवी ,
असहाय्यासी तू सहायक
सर्वेश्वरी तू भक्तसंरक्षक
संथ वाहतेस गंगामाई
कृपाछत्र ठेव तू माझे शिरी .
याची तुलना , स्वामींनी मला दिलेल्या , ' ॐ श्री साई वसंत साई साय नमः ' या मंत्राशी करता येईल . ह्या मंत्राने भक्तांच्या समस्या व व्याधींचे निराकरण होऊन त्यांना परमशांती लाभते . सर्वांचा पापसंहार होतो . अनेकानेक यामुळे लाभान्वित झाले आहेत . हा मंत्र स्वामींना व मला जोडतो . स्वामींनी मला १०८ नामे दिली , त्यातसुद्धा आमचा योग व्यक्त झाला आहे . हा मंत्र देह , मन व आत्मा हे मानवाचे त्रिविध ताप , म्हणजे जन्म या व्याधीचे निवारण करतो . हा मंत्र सत्ययुगाचे बीज आहे . माझ्या कठोर तपाने प्रसन्न होऊन स्वामींनी हा मंत्र दिला . ह्या मंत्राद्वारे पापसंहार होऊन मानवजात आनंदास प्राप्त होईल . काही नामे स्वामींच्या देहाच्या विविध अंगांशी संबंधित आहेत . यावरून हे लक्षात येते की मी स्वामींपासून वेगळी नसून स्वामींमध्ये ' एक ' झाले आहे . म्हणून मला हे सर्व शक्य आहे .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा