रविवार, २९ जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

       " तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे , अन्य काही नाही ". 

पुष्प २१ पुढे सुरु

              दैवी आनंद कसा असतो ? मानव तो समजू शकणार नाही . तांदुळाच्या पीठाचे बनवलेले दुध प्यायल्यामुळे अश्वत्थामाला खऱ्या दुधाची चव माहित नव्हती . त्याचप्रमाणे जगाचा स्वाद घेण्यामध्ये रमलेल्या माणसांना परमेश्वराचा स्वाद माहीत नाही . त्यांनी खरा स्वाद चाखलाच नाहीय . स्वामी व मी सर्वांना परमेश्वराचा स्वाद चाखविण्यासाठी अन्  सर्वांना जीवनमुक्त करण्यासाठी येथे आलो आहोत . म्हणून यावेळी मनुष्याने ज्ञान प्राप्ती करून ते स्पष्टपणे समजून घेतलेच पाहिजे . पुरे आता ! या मायेतून जागे व्हा . 
            काल हा अध्याय लिहून संपल्यानंतर साईप्रियाने एक छोटेसे पाकीट आणले . त्यात मोहरीच्या आकाराचे पाच चमकते मणी होते .
६ मे २०१३ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी , तुम्ही काल दिलेले ५ मणी म्हणजे काय ? 
स्वामी - तू पंचेंद्रियांवर विजय मिळवून पंचतत्वे नियंत्रणात आणलीस . त्यांचे लघुरूप करून हे मणी मी तुला दिले . आभूषण करून तू ते गळ्यात घाल . 
वसंता - आता मला समजले . परंतु तो मधासारखा रंग काय सुचवतो ? 
स्वामी - तू सर्वांना अमृत समान बनवितेस . 
ध्यान समाप्ती 
            आता आपण पाहू या . कालच्या अध्यायात मी पंचेंद्रियांना आभूषण म्हणून कसे गळ्यात घातले ते लिहिले . यासाठी स्वामींनी आता मला ५ छोटे मणी दिले . ही पंचेंद्रिये अत्यंत शक्तिशाली असून ती मानवाला गुलाम बनवितात . पंचतत्वेही अत्यंत बलवान असून त्यांच्यामध्ये जगाचा संहार करण्याचे सामर्थ्य असते . मी त्या दोन्हीवर नियंत्रण ठेऊन त्यांच्यावर विजय मिळवला . म्हणून मी पंचतत्वे आभूषणासम गळ्यात घालते . हे दर्शविण्यासाठी स्वामींनी आता मला छोटे मणी दिले . मी पंचेंद्रिये व पंचतत्वांवर ताबा मिळविल्यामुळे ते अमृतमणी झाले .

जय साई राम 

व्ही. एस.  
           
            
             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा