गुरुवार, १९ जून, २०१४

ॐ श्री साई वसंत साई साय नमः 

सुविचार

" निर्मल हृदयामधून सत्य प्रकाशमान होते ".

पुष्प २१ पुढे सुरु 

              आता प्रकृती माझे रूप घेऊन आली . निर्मितीची असंख्य रूपे दर्शविणाऱ्या प्रकृतीची दूत बनून मी आले . मी अत्यंत साधे न/ आदर्श जीवन व्यतीत करत आहे . मी माझ्या जीवनात नवविधा भक्ती मार्गाचे आचरण केले , अन/ माझ्या जीवन शैलीद्वारे गीतेतील १८ अध्यायांचे प्रात्यक्षिक केले . मी सर्व उपनिषदांनी सांगितल्यानुसार जीवन जगत आहे . मी ब्रम्हसुत्रावरही विवरण करून माझ्या जीवनात त्याचे प्रात्यक्षिक केले . माझे जीवन प्रेमसूत्र , आनंद सूत्र व शांती सूत्र यांचे जिवंत उदाहरण आहे . ही सर्व सूत्रे मी माझ्या जीवनाद्वारे विषद केली . माझी जीवन शैली या सर्वांचेच प्रात्यक्षिक आहे . मानवामध्ये कार्यरत भावविश्वाद्वारे एक जीवात्मा परमात्मा कसा होतो हे मी दाखवून दिले . माझ्या १२० हून अधिक पुस्तकांमधून मानवाला परमेश्वर प्राप्तीचे शेकडो मार्ग मी सांगितले . जो तो आपापल्या स्वभावानुसार परमेश्वर प्राप्तीच्या कोणत्याही मार्गाची निवड करून भगवत प्राप्ती करू शकतो . योगसुत्राचे आचरण माझ्या जीवनात मी कसे केले ते मी लेखनात बद्ध केले आहे . परमेश्वर प्राप्तीसाठी मी जन्मल्यापासून केलेले प्रयास , किती वैविध्यपूर्ण मार्गांनी परमेश्वर प्राप्ती होऊ शकते अशा सर्व विषयांची माहिती माझ्या पुस्तकातून होऊ शकते . कर्म म्हणजे काय , कर्माचे विविध प्रकार आणि स्वप्रयत्नांनी संहार कसा करावा या विषयी मी तपशीलवार लिहिले आहे . मी अनेक कठोर व्रतवैकल्ये केली ,  प्रतिज्ञा केल्या व ७३ वर्षे परमेश्वरासाठी अश्रू ढाळले . एवढ्या सगळ्या अथक प्रयत्नानंतर प्रतिसाद म्हणून त्यांनी मला माझ्यावरील त्यांचे प्रेम व्यक्त केले . एवढे महाप्रयास केल्यानंतरच परमेश्वर आपल्या साधनेला प्रतिसाद देतो . परमेश्वर व साधक यांमधील संबंध आपण जाणून घ्यायला हवा . ' इथेच ! या क्षणी !!मुक्ती !!! ' या माझ्या पहिल्या पुस्तकात ' प्रयत्न आणि कृपा ' नावाचा एक अध्याय लिहिला आहे . आपल्या प्रयत्नांच्या प्रमाणातच आपल्याला परमेश्वरी कृपा प्राप्त होत असते . स्वामी आणि मी सुद्धा हेच उघड करीत आहोत . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा