ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" देहभाव गळून पडल्यावर सत्याचा साक्षात्कार होतो. "
पुष्प ३३ पुढे सुरु
सकाळी स्वामींनी सुशोभित केलेला एक छोटा चंदेरी रंगाचा बॉक्स दिला. आतमध्ये एक सप्तरंगी षट्कोन होता. त्यावर स्वामींनी ' ॐ साई राम ' लिहिले होते . राम मधल्या ' M ' पाशी S आणि V एकत्र होते . आतमध्ये स्वामींचा आशीर्वाद देणारा फोटो होता . त्याच्या मागे एक कॅलेंडर होते . त्याची सुरुवात ऑगस्ट २००३ ने झाली व शेवटचा महिना जुलै २००४ होता . त्यावर स्वामींनी लिहिले होते-
अग्नीपुत्रीस
साईप्रेमीकडून
हे शब्द तेलगूमध्ये लिहिले होते . त्याच्याखाली १० चंदेरी चांदण्या होत्या . आता आपण याविषयी पाहु. ते शब्द तेलगू असल्यामुळे अर्थ जाणण्यासाठी आम्ही ते श्री राव यांच्याकडे पाठवले . २००३ ते २००४ या काळामध्ये स्वामींनी आणि मी अत्यंत क्लेश सहन केले. सुरुवात ऑगस्ट २००३ व शेवट २००४ असलेले विचित्र कॅलेंडर स्वामीनी कां बरं दिले ? मला काही समजले नाही . कृष्ण जयंती च्या दिवशी उत्सवास सुरुवात झाली . १६ मे २०१३ संध्याकाळचे ध्यान
वसंता - ऑगस्ट ते जुलै , अशा या कॅलेंडरचा अर्थ काय , स्वामी ?
स्वामी - ऑगस्टपासून मी माझ्या आगमनाची अनेक चित्रे दाखवली . तेव्हापासून तुझेही शारीरिक क्लेश अधिक वाढले . मे पासून त्यामध्ये सुधार होईल .
वसंता - खरच स्वामी ! परंतु रोज नवीन त्रास उद् भवत आहे .
स्वामी - ही दोन औषधे घे. सगळ काही ठीक होईल. मी ही येईन आणि तुझे सर्व क्लेश संपतील .
ध्यान समाप्ती
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम