मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई  साय नमः


महाशिवरात्र निमित्य 
सर्व साधनांचा अंतिम उद्देश
   
वद्य पक्ष चतुर्दशी। जास्तीत जास्त क्षय चंद्रमासी ।
चंद्रामुळे मानस ये अधिष्ष्ठितेसी। साधनेसी पराकाष्ठा ये दिनी ।।१।।

रात्री करावे प्रयत्ना। नष्ट होतो स्वप्न आणि कल्पना । 
यांसहित हो मानस निर्मूलना। साधकांना साध्य साधे ।।२।।

या तिथीस म्हणतो शिवरात्र। तिच्या आगमना सर्व महिने पात्र ।
माघ महिन्यात महाशिवरात्र। साधना सत्र या मुहूर्ती ।।३।।

शिवरात्र मानवाच्या। सुविजयी अस्तित्वाच्या । 
स्मृतीच्या आणि ध्येयाच्या। उजळा देण्याच्या कामास येते ।।४।।

( सौ. सीता कुलकर्णी यांच्या ' भगवान श्री सत्यसाई सच्चरित ' यामधून )

                   शिवोपासना करण्यासाठी, महाशिवरात्र वर्षातून केवळ एकदाच येत नाही तर दर महिन्यात शिवरात्र येते . ही रात्र एवढी महत्वाची का आहे ? रात्रीवर चंद्राचे अधिपत्य असते . चंद्राला १६ कला आहेत . कृष्ण पक्षातील प्रत्येक रात्री, अमावस्ये पर्यंत त्याची एक एक कला कमी होत जाते व अमावस्येच्या दिवशी चंद्राचा पूर्णतः क्षय होतो. त्यानंतरच्या प्रत्येक रात्री एक एक कला वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण चंद्रबिंब दिसते. चंद्र ही मनाची अधिष्ठात्री देवता आहे . मनाची ही चंद्रासारखी वृद्धी आणि क्षय होतो . ' चंद्रमा मनसो जातः ' परमात्म्याच्या मनापासून चंद्राचा जन्म झाला आहे. 
                अमनस्क बनण्यासाठी , मनोनाश हेच सर्व साधनांचे अंतिम ध्येय आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे . तरच मायेचा पगडा दूर होऊन सत्याचे प्रकटीकरण होईल . जर ह्या दिवशी पूजा , जप , ध्यान या सारख्या आध्यात्मिक साधनांद्वारे काही विशेष प्रयत्न केले तर निश्चितपणे यश प्राप्त होते . उपवास आणि रात्रभर जागरण करून त्या रात्री केवळ शिवाचे ध्यान करावे. 
                प्रत्येकाने दर महिन्याच्या शिवरात्रीस तसेच वर्षातून एकदा येणा-या  या महाशिवरात्रीस ही  विशेष अध्यात्मिक साधना केल्यास मनामध्ये आत्मनिवासी परमात्म्याची अखंड जाणीव राहून जे शवम् ( मृत ) आहे ते शिवम् होईल.


भगवान बाबांच्या दिव्य प्रवचनातून 
 ( फेब्रुवारी ६९ महाशिवरात्र ) 



जय साईराम      
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा