ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" मनुष्याने त्याचे विहित कर्म करताना येणारी दुःख आणि ताप सहन केले आणि आपले कर्तव्य चोख बजावले तर ते तप बनते ."
पुष्प ३३ पुढे सुरु
वसंता - स्वामी, आता मला हे असह्य झाले आहे, एकतर तुम्ही स्वतःस मला द्या किंवा तुम्ही हा जीवप्रवाह घ्या.
स्वामी - असं नको बोलूस. मी लवकरच येईन . रडू नकोस. तू माझा जीवप्रवाह आहेस , या जीवाचे चैतन्य आहेस.
वसंता - स्वामी तुम्ही खरच येणार का ? स्वामी तुम्ही औषध देईन म्हणालात परंतु दिले नाही. तेथे फक्त कस्तुरी पावडर सापडली .
स्वामी - हेच तुझे औषध आहे . त्यातील सकाळी अर्धे घे.
वसंता - हे औषध आहे ? स्वामी , मी ते कसे घेऊ ?
स्वामी - सकाळी एकदा घे आणि अभिषेकानंतर घे .
वसंता - खरच स्वामी ? मी घेईन. दोन खड्यांचा अर्थ काय ?
स्वामी - आपण दोघं हिरे आहोत आणि सर्वांना हिऱ्यांसारखे बनवत आहोत .
वसंता - आता मला समजले स्वामी . मी लिहीन .
ध्यान समाप्ती
आता आपण याविषयी पाहु. स्वामींनी मला कस्तुरी पावडर औषध म्हणून घेण्यास सांगितली. अमरनी इंटरनेटवर त्याची माहिती काढून त्याची छापील प्रत काढली . अनेक व्याधींच्या उपचारांसाठी या पावडरचा उपयोग केला जातो असे त्यामध्ये म्हटले होते . वैश्विक कर्म ही माझी व्याधी आहे . केवळ स्वामीच माझा आजार बरा करू शकतात . किती औषधे ? किती डॉक्टर्स ? स्वामींनी मला डॉक्टरांकडून औषध घेण्यास सांगितले . त्याचप्रमाणे मी घेतलेही परंतु व्यर्थ ! आता मला अधिकच त्रास होतोय . स्वामींनी अनेक औषधांची नांवे लिहली. डॉक्टरांचे नावही लिहले व त्यांच्याकडे मला जाण्यास सांगितले . त्यांनी माझ्या पायाचे फोटो काढून डॉक्टरांना दाखवले व औषध घेऊन आले. डॉ. रामस्वामी वरचेवर येथे येतात व मला औषधे देतात.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा