ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आपला मृत्यू त्याचे ठिकाण आणि वेळ ही अगोदरच निश्चित केलेली असते व त्यानुसार ते घडते . यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही . "
पुष्प ३२ पुढे सुरु
ज्यांच्या ठायी शुद्ध प्रेम आहे केवळ तेच परमेश्वराला पाहू शकतात . म्हणून आपण आपले हृदय प्रेमाने ओतप्रोत केले पहिजे. केवळ प्रेम सत्यदर्शन घडविते . हे प्रेम स्वार्थी नसावे तर विश्वामधील सर्वांसाठी निरपेक्ष निस्वार्थ प्रेम असावे . माझ्या प्रेमाने स्तूप प्रेममय होतो आणि स्तुपाद्वारे सत्य आणि प्रेम सर्वव्याप्त होते.
स्वामींनी काल एक चित्र दिले. त्यात दोन गुलाब होते. एक मोठा तर दुसरा लहान . शिवाय ६ कळ्या व १९ पाने होती. खाली लिहिले होते.
फोटोफ्रेम - ४"×६"
क्रमांक ४६ निर्मितीसाठी
आवश्यक गुणसूत्रांचा सूचक आहे. स्वामींची जन्मतारीख २३ आणि माझीही
जन्मतारीख २३ आहे . आमच्या हृदयांत म्हणजे विश्वब्रम्ह गर्भ कोटम् मध्ये
या दोन संख्या मिळून गुणसूत्रांचे कार्य करतात , आणि यातून नवनिर्मिती होते
मोठा गुलाब म्हणजे स्वामी, मूलअग्नी तर छोटा गुलाब म्हणजे मी - त्यांची
शक्ती. ६ कळ्या षड्गुणांसाठी आहेत तर १९ पाने माझे १९ गुण सुचवितात. या
गुणांद्वारे विश्वपरिवर्तन होते. माझे १९ गुण सर्वांमध्ये कार्यरत होतील .
ते एका चौकटीत कार्य करतात याचा अर्थ सत्ययुगामध्ये कार्यरत होतात . हे
कलियुगातील सत्ययुगासारखे आहे. हे आहे प्रेम, अखिल निर्मितीवर वर्षवलेले
प्रेम. या प्रेमाद्वारे सत्याचे सर्वव्यापकत्व आपण व्यक्त करू शकतो म्हणून
सर्वांना प्रेम द्या.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा