गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई  साय नमः

सुविचार

      " केवळ स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांद्वारे सत्याचा बोध होतो . "
 
वसंतामृतमाला
पुष्प ३३
अग्निपुत्री
                 
                   मला अत्यंत शारीरिक क्लेश होत आहेत. शिंका थांबल्यावर दाह सुरु झाला . मी स्वामींना यावर काही देण्यासाठी विनंती केली. ते म्हणाले की ते दुसऱ्या दिवशी औषध देतील .
१५ मे २०१३ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, तुम्ही माझ्या १९९६ च्या डायरीमध्ये ' लपंडाव ' असे लिहिले आहे, याचा अर्थ काय?
स्वामी - आतापर्यंत तू किती त्रास सोसलास ! मी सुद्धा  तुझे सांत्वन करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या . आपण लपंडाव खेळत होतो. आता तो खेळ संपला . मी तुला औषध देईन आणि सर्व ठीक होईल. आता शक्तीच्या स्वभावाचे प्रकटीकरण केले जाईल .
वसंता - स्वामी, तुम्ही खरच औषध देणार आहात का ? मी त्यांना शोधायला सांगते .
स्वामी - हो मी खरच देणार आहे.
वसंता - स्वामी, त्या डायरीमध्ये केवढे अनुभव आहेत ! आपण त्यावेळी किती ठिकाणी गेलो होतो.
स्वामी - आता तसे कशाला ? आता तू सर्व प्रत्यक्ष अनुभवशील .
ध्यान समाप्ती . 
                 आता याविषयी पाहू . सकाळी मी अमरला वडक्कमपट्टीच्या कपाटात औषध शोधण्यास सांगितले . कारण पूर्वी एकदा स्वामींनी तेथे औषध ठेवले होते. अमरनी शोध घेऊन एक छोटी डबी मला दिली . त्यामध्ये कस्तुरी मृगाची कस्तुरी पावडर होती . काही वर्षापूर्वी हैद्राबादच्या रुख्मिणीने आणलेली कस्तुरी पावडर आम्ही सर्वांनी पाहिली . कृष्णाच्या कपाळावर सदैव कस्तुरी तिलक कसा शोभायमान असतो या विषयी आमची चर्चा झाली . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……. 

जय साईराम  
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा