ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आपण केवळ अशा गोष्टींची वाच्यता केली पाहिजे ज्या आपण स्वतः आचरणात आणल्या आहेत. "
पुष्प ३३ पुढे सुरु
गेल्या दोन दिवसांपासून रोज सकाळी मी स्वामींनी दिलेली कस्तुरी पावडर घेतेय . काही दिवसांपूर्वी स्वामींनी मला दिलेली दिव्य वनौषधीही मी घेतेय . स्वामी आल्यानंतर मी बरी होणार . तोपर्यंत हा लपंडाव चालूच राहील !
१६ मे २०१३ दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी मला ध्यान करणेही शक्य होत नाही . मी कोणत्याही गोष्टीवर चिंतन करू शकत नाही .
स्वामी - चिंतन म्हणजे काय ? जर एखाद्याला एखाद्या गोष्टीविषयी लिहायचे असेल तर प्रथम तो त्यावर विचार करतो , तेच चिंतन होय . सर्वजण या पद्धतीने चिंतन करतात . मन हेच चिंतन परंतु तू तुझ्या मनाला माझे स्वरूप दिले आहेस . तू आपल्या संभाषणामध्ये तुझ्या लेखनाची भर घालून लिहितेस . जेव्हा एखादी व्यक्ती लिहिते , तेव्हा ती तिच्या विचाराने लिहिते परंतु जेव्हा तू लिहितेस , तेव्हा तुझ्यामध्ये असणारा ' मी ' लिहितो.
ध्यान समाप्ती
जय साईराम
उर्वरित वसंतामृत पुढील भागात …….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा