रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई  साय नमः 

सुविचार

" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे . "

पुष्प ३३ पुढे सुरु

               ' चिंतन म्हणजे काय ? ' सर्व साधारणपणे एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करणे . त्यानंतर त्यावर चर्चा करून लिखाण करणे . इथे माझ्या मनाच्या रूपाने स्वामीच कार्यरत आहेत . स्वामीच माझ्यामधून बोलतात आणि नंतर मी आमच्या संभाषणाविषयी लिहिते . लिखाण करते वेळी मी त्या विषयी विचार करत नाही तर ते स्वाभाविकपणे माझ्या आतून ओघवते . माझ्यामधील स्वामीच हे लिहितात हे यावरून दिसून येते . 
                स्वामींनी लिहिलेल्या ' ब्रम्हांड स्फोट ' या    कवितेत स्वामी म्हणतात , 
 देह स्तुपाचा तूची होऊनी
अंतरी तयाच्या विद्यमान मी 
               हे तेच आहे. माझ्या देहामध्ये केवळ स्वामीच भरून राहिले आहेत. म्हणून मला योग्य रितीने ध्यान करणे शक्य होत नाही. आम्ही केवळ ध्यानामध्येच संभाषण करू शकतो . परंतु आता माझ्या शारीरिक क्लेशांमुळे मला ध्यान करणे शक्य होत नाही . माझे ध्यान होत नाही . तथापि मला कितीही शारीरिक क्लेश झाले तरी माझे लेखन अखंड चालू आहे . मी लिहीतेच आहे . अशा प्रकारे माझ्या अंतर्यामी असणारे स्वामीच माझ्याद्वारे लिहित आहेत . त्यासाठी चिंतन, वा ध्यान करण्याची आवश्यकता नाही . फक्त सर्वांना मुक्त करायचे आहे ! 
 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात …….

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा