ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" केवळ सर्वसंगपरित्याग केल्याने मोक्ष प्राप्ती होते ."
पुष्प ३२ पुढे सुरु
भगवंत संभ्रमित जाहला
त्यानेही ना देखिला
असा विलक्षण सामर्थ्यशील
अग्निस जाळणारा अग्नि !
भगवंत म्हणतो ….
" नको मागुस वैश्विक मुक्ती !
चुकवू दे मुल्य प्रत्येक जीवास
त्याच्या सत् असत कर्माचे
हेच खरे बीज !
प्रत्येकास भोगू दे कर्मफल
आपापल्या कर्मांचे
तप साधनेने तुझ्या, होऊनी प्रसन्न
देऊ करेन मी अवतारपद तुज
वा अन्य वरदान माग मजसी तू
माझे कोमल सुमन तू
आहेस माझी मधुरिमा
हृदयसम्राज्ञी तू माझी
माझी तेजोमय पौणिमा !"
" जीवलगा , प्रियतमा
प्रलोभन दावुनी अवतारपद
पकडू नकोस मज
मधुर शब्दांच्या जाळ्यात
पातिव्रत्यास माझ्या ध्यास केवळ तुझा "
" परि इनाम देऊ इच्छितो मी तुज
हे अग्निसुमना !
युक्तिवाद न करी मजसवे .
मीच कायद्याचा कर्ता करविता
कैसे करू उल्लंघन , सांग वसंता !"
गिरीपर्वत कापती थरथर
भयभीत होऊनी गोठती महासागर
अचंबित देवांनी, प्रिय स्वामींसवे
केला युक्तिवाद
अखेरीस त्या करुणामुर्तीने
प्रसन्नचित्त दिधले आशीर्वचन
" काही भक्तांसवे रहा ,
बांधोनी आश्रम !
दिव्य नाडी भाकितानुसार
स्तूप तू स्थापित कर
देह स्तूपाचा तुची होऊनी
अंतरी त्याच्या विद्यमान मी
माझ्यातूनी उदय
माझ्यातची लय
होईल तुझा !"
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा