ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो अहंकार आणि इच्छा यांच्या मलीनतेपासून मुक्त असतो त्यांच्या मनाच्या आरशामध्ये सत्य झळकते. "
प्रकरण चार
आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु
मी १९८४ मध्ये कृष्णाला पत्र लिहिले. १२ वर्षांनंतरही मी दृश्यामध्ये तोच वर मागितला. ही सर्व परमेश्वराचीच कुशल योजना आहे, हे आता मला स्पष्ट झाले.
२० सप्टेंबर २००८ ध्यान
मी स्वामींना या पत्राविषयी व दृश्याविषयी विचारले.
स्वामी म्हणले,
" परमेश्वरासाठी तू प्रत्येक संतमहात्म्याकडे धावलीस. तुला त्यांनी ध्यानदृश्यांद्वारे आशीर्वाद दिले. आता नाडीग्रंथातून अनेक संत तुझे परमेश्वराशी असलेले शाश्वत नाते प्रकट करत आहेत."
भगवानांचा जन्मदिन - २३ नोव्हेंबर १९८५
स्वामींना मी अखंड प्रार्थना करत होते, " पुट्टपर्तीतील स्वामींचा जन्मदिन सोहळा पाहण्यासाठी संजय आणि अगस्त्य ऋषिंप्रमाणे मलाही दिव्य दृष्टी प्रदान करा." २४ नोव्हेंबर १९८५ ला स्वामींनी माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला. सतत आठवडाभर भगवानांच्या जन्मदिनाचा सोहळा मला स्वप्नामध्ये दिसत होता. त्याचे वर्णन मी खाली दिलेल्या गीतामध्ये केले आहे. गीताचे शीर्षक आहे
' हृदयगवाक्षातून पाहिलेला सोहळा '
वडक्क्मपट्टी अन् पुट्टपर्ती दूर आहेत एकमेकांपासून
तरीही अष्टाक्षरी व्यवहार चालतो त्यांच्यात
मज हृदय दिलेस तूच, करी चिंतन ते सदा तुझेच
भावभावनांच्या मधुर संगीताचे गूज
लाभे परमानंद तव कृपेच्या वर्षावाने
अशा तऱ्हेने माझ्या अंतःकरणात उमलणाऱ्या भाव व विचार व्यक्त करणाऱ्या गीतांची मालिका सुरु झाली. मी तो संपूर्ण सोहळा डोळे भरून पाहिला आणि या पद्यरचनांच्या रूपात स्वामींना अर्पण केला. मी स्वामींना म्हणाले, " मी या पद्यरचना तुमच्या दिव्य चरणांवर अर्पण करते, कारण त्या तुमच्याच आहेत."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम