ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मायेच्या पिंजऱ्यातून स्वतःला मुक्त करा, परमेश्वर ही एकमात्र इच्छा ठेवा."
प्रकरण चार
आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु
पत्रांची वही चाळताना मी ह्याच पत्राचे पान का उघडले ? त्याचा या प्रकरणात उल्लेख करण्यासाठीच.
माझ्या नाडीत असे म्हटले आहे की हजारो लोक माझ्या दर्शनासाठी प्रतीक्षा करतील. मी उद्गारले, " मला याचा काय उपयोग ? मी त्या प्रत्येकाकडे जाऊन विचारेन, " तुम्ही मला स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन जाल का ?" याचा उल्लेख मी ' आनंदसूत्र ' पुस्तकात केला आहे. मला फक्त स्वामी हवेत. मला अन्य कशातही रस नाही. मला केवळ त्यांचे दर्शन पुरेसे आहे. ही माझी अवस्था आहे. मी जन्मल्यापासूनच कृष्णासाठी रडत आहे. कृष्ण म्हणाला, " साई आणि मी एकच आहोत. तू जा आणि स्वतः याची अनुभूती घे." यामुळे माझे प्रेम स्वामींकडे वळले. आज त्यांनी हे सिद्ध केले की तेच कृष्ण आहेत.
माझ्या पहिल्या पुस्तकात ४ जून १९९६ रोजी मी पाहिलेले ध्यानातील दृश्य नोंद केले आहे ( दृश्य ).
... ' अगस्ति ऋषी व त्यांची पत्नी लोपामुद्रा माझ्यासमोर प्रकट झाले. त्यांच्या कमंडलूमध्ये कावेरीचे पवित्र जल होते. त्यांनी ते माझ्यावर शिंपडले व ते म्हणाले," तुला काय हवे ते माग. " मी म्हणाले, " हे ऋषिवरा, स्वामींचे माझ्याप्रती असलेले प्रेम तसूभरही कमी होऊ नये. मी त्यांच्यावर अधिकाधिक प्रेम करावे. त्या प्रेमाने त्यांनाही माझ्यासाठी असाच ध्यास घ्यावा. गेली ३५ वर्षे मी केवळ परमेश्वरासाठीच अश्रू ढाळते आहे. परमेश्वरानेही माझा ध्यास घ्यावा, माझ्यासाठी वेडेपिसे व्हावे. तरच त्यांना माझी तगमग समजेल. " अगस्ती ऋषी म्हणाले, " तथास्तु !"
दृश्य समाप्ती.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा