रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " सत्याचा साक्षात्कार सहजतेणे होत नाही त्यासाठी पूर्णतः आत्मशुद्धी व्हावी लागते. "

प्रकरण चार 

आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु 

               संत तिरुवल्लुवर यांच्या तिरुकुरलवर आधारीत मी स्वामींवर काही दोन दोन ओळींच्या पद्यरचना केल्या आहेत, त्या खाली देत आहे. 

... कर्म किंवा दैवगतीची बाळगू नका भीती 
कृपा संपादन करा साईंची

... दानधर्म वा तप करण्याची गरज नाही 
करा साईंचे ध्यान 

...ज्यांच्या हृदयात आहेत साई 
त्यांनी इंद्रियास जिंकीले 

...पृथ्वीवरील कोणत्या गोष्टीची इच्छा धराल ?
साईंचे चरण 

... साईंच्या शिकवणीतून लाभ होईल 
शिकवण पूर्णत्वाने आचरणात आणली तरच 

...तुम्हाला जर काही हवे असेल तर 
मागा केवळ त्यांचे चरण 

... तुम्ही त्यांची भक्ती करा, पूजन करा 
ते तुम्हाला अमरत्व बहाल करतील 

... शुचिता, प्रेम, सदाचरण, अहिंसा 
हाच मार्ग आहे सत्य भगवंताचा 

... त्यांची कृपा, प्रेम घडवून आणेल विश्वात परिवर्तन 
दुष्टांचा नाश, हा त्यांचा स्थायीभाव 

... ज्यांनी ' साईनाम ' ऐकलेच नाही 
ते म्हणती अमृत मधुर असते. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा