ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" ना संभ्रमाचे तिमीर
ना द्वंद्वाचा धोका भयंकर
ना मायेचे कृष्णमेघडंबर
येथे भक्तीचे संगीत मधुर
सत्याची पहाट आहे ही तर
आत्म्याचा सुंदर बहर
जेथे जाते माझी नजर
तेथे दिव्यत्वात शांती स्थिर "
प्रकरण चार
आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु
दिवस पहिला
हा महासागर आहे ?
का सागर ?
जमला प्रचंड जनसमुदाय
दिवस दुसरा
नजर टाकीता दशदिशांस
दिसे अफाट जनसागर
तिष्ठती जन दिव्य चरणांच्या ओझरत्या दर्शनास
ही तर त्या परम ईश्वराची कृपा
उसळती जनसागर लहरी
लयलूट ही परम आनंदाची
दर्शनाने वितळती ओझ्यांचे पर्वत
महद् आश्चर्य हे ! करूणा परमेशाची !
तिसरा दिवस स्वर्गाची अरुंद दारे
क्षणार्धात बदलली त्याने
आता स्वर्गास दारेच नाहीत
येईल त्यास आश्रय, असा आहे हा स्वर्ग
दिवस चौथा
हे औदार्य गोमातेचे
मधुरामृत मातेच्या ममतेचे
वस्त्रदान करिती सर्वांसी
हे परमप्रेम त्या प्रभूपरमेशाचे
देतो परमधाम सर्वास
मुक्त हस्ते उधळीतो सुवर्णाची रास
प्रवेशद्वार हे स्वर्गाचे
क्षुधाशांती करी प्रसाद देवोनी
ही अपरिमित कृपा, मातृहृदयाची
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा