गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आपण जन्म का घेतला ? पुन्हा केवळ मृत्यू पावण्यासाठी आपण जन्म घेतला आहे का ? आपण मुक्त होण्यासाठी आणि इतरांसमोर आदर्श उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी जन्म घेतला आहे. " 

प्रकरण चार

आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु 

               मी माझी जीवनगाथा का लिहीत आहे ? अनेकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी. काहीजण म्हणाले, 
               " तुम्ही वेगळा आश्रम का स्थापन केलात ?  जर तुम्ही खऱ्या साईभक्त आहात तर वेगळ्या आश्रमाची गरजच काय ? तुम्ही साई संघटनेचे सभासद बनून समितीमधील भजन, सेवा इ. उपक्रमात भाग घेतला पाहिजे. तुम्ही ही  सर्व पुस्तके लिहून स्वामींची प्रतिमा का मलिन करताय ? विश्वगर्भ कशासाठी ? " 
                 अशाप्रकारे अनेक शंका उदभवल्या आहेत. मी लिहिलेल्या क्रमानुसार जे माझी पुस्तके वाचतात, ते माझी अवस्था जाणू शकतात. तथापि सर्वांना हे शक्य नाही. या कारणास्तव स्वामींनी मला आत्मचरित्र लिहिण्यास सांगितले. 
                 मी कृष्णाला आणि स्वामींना हजारो पत्रे  लिहिली आहेत व वह्यांमध्ये त्यांच्या नोंदी केल्या आहेत. मी कृष्णासाठी किती अश्रू ढाळलेत ! पंधरा वर्षे मी रात्री झोपले नाही. मी सदैव कृष्णाच्या विचारात जागी असे. याच दरम्यान मी ही हजारो काव्ये व गीते लिहिली. मी घरातील भिंतींवरही लिहीत असे. किती पत्रे ! 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा