ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपली परमेश्वराप्रती असलेली भक्ती आपल्या नको असलेल्या प्रवृतींचे सद्गुणांमध्ये परिवर्तन करते. "
प्रकरण चार
आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु
हा भव्यदिव्य सोहळा
जन्मदिन परमेशाचा
प्रभुकृपेने होईल
आपुला कर्मसंहार
चोहीकडे उत्सवाचे वातावरण
दिवस सहावा
प्रिय प्रभुंना दुग्धाभिषेक
भक्तीच्या परमानंदाचे रूप
दिव्यत्वाला मधाभिषेक
भक्तांच्या परमप्रेमाचे रूप
दिव्य मनमोहनाला समर्पित पुष्पमुकुट
भक्तांच्या उत्साहाचे रूप
प्रभूंचा सुवर्णमुकुट
त्यांच्या प्रियजनांचे हृदय
झुलणारा हिंदोळा त्यांचा
स्वरूप अखिल निर्मितीचे
दिवस सातवा
तेजोवलयांकित मुकुटधारी स्वामी चिरायू होवोत !
त्यांचे परमकरुणामयी नेत्र चिरायू होवोत !
प्रेम हाची श्वास जिचा , नासिका ती चिरायू होवो !
अमृतवाणी उच्चारणारे दिव्य मुख चिरायू होवो !
रंजल्या गांजल्यांच्या विनवण्या ऐकणारी कर्णेनद्रिये चिरायू होवोत !
चंदेरी घंटांच्या सुरावटीत झंकारणारा त्यांचा आवाज चिरायू होवो !
वेदांचे निकेतन दिव्य वक्षस्थल चिरायू होवो !
स्वस्पर्शी दिव्य महाबाहू चिरायू होवोत !
ब्रह्याचे निकेतन दिव्य नाभी चिरायू होवो !
सर्वांना सुमार्गावर घेऊन जाणारे दिव्य चरण चिरायू होवोत !
समस्त विश्वाचा आश्रय ही सोनपावले चिरायू होवोत !
चिरायू होवोत ! चिरायू होवोत !!
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा