ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेव्हा आपली भक्ती अधिक शुद्ध आणि परिपक्व होत जाते तेव्हा परमेश्वर आणि आपण यातील अंतर कमी होऊन गोष्टी आपोआप घडून येतात."
चंद्र
आणि मन
हळूहळू मला ध्यानामध्ये अनेक दृश्य दिसू लागली. त्यांची मी माझ्या डायरीमध्ये नोंद ठेवली आहे.
दरवर्षी आम्ही पादुकापूजनासाठी पुट्टपर्तीला जात असू. आम्हाला स्वामींचे दर्शन आणि पादनमस्कार मिळे. जिथे जिथे स्वामींचे चमत्कार घडत तिथे जाऊन, स्वामींच्या लीला पाहून मी आनंदविभोर होत असे. परमकुडीचे डॉ. कोदंडपाणी यांच्या घरी अनेक चमत्कार होत असत. स्वामींनी मला लिहिण्यास सांगितलेले ' इथेच याक्षणी मुक्ती ' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनीच मला प्रोत्साहन दिले. माझे संपूर्ण जीवन साईमय होऊन गेले.
***
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा