गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी तुम्ही काही केले नाही तरी हरकत नाही परंतु त्यांच्या आनंदावर विरजण घालू नका."

प्रकरण सहा 

मंत्र 

                पुन्हा एकदा स्वामींनी मला लिहिण्यास सांगितले. ह्यावेळेस विषय होता ' उपनिषदे '. मी लिहिण्यास सुरुवात केली आणि लवकरच असे लक्षात आले की माझे जीवन ह्या ग्रंथांमधील तत्वज्ञानाचे निदर्शक आहे. मी १० उपनिषदे लिहिली. त्यामध्ये उपनिषदांमधील उच्च ज्ञान विशद करण्यासाठी मी माझे भावविश्व आणि स्वभाव यांची उदाहरणे दिली. अनेक जण वेद आणि उपनिषदे आणि इतर ग्रंथ वाचतात आणि त्यानंतर त्यातील तत्वज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आधी ज्ञान आणि नंतर आचरण माझे जीवन याच्या उलट आहे. आधी आचरण, ज्ञानप्राप्ती आणि मग अनुभवाचे बोल. माझी जीवनशैली वेद आणि उपनिषदांची तत्वे आचरणात कशी आणायची, याचे निदर्शन करते. 
                त्यानंतर स्वामींनी मला ' उपनिषदांच्या पलीकडे ' लिहिण्यास सांगितले. मुक्ती निलयममध्ये राहायला आल्यानंतर मी या पुस्तकाचे लिखाण केले. हे पुस्तक पूर्णपणे माझ्या मनातील भाव आणि विचार यावर आधारित आहे. सूक्ष्मदेह आणि कारणदेह यापासून अलग झालेल्या आत्म्यामध्येच असे भाव, विचार निर्माण होतात, असे स्वामींनी सांगितले. जो ईश्वराशी तादात्म्य पावतो त्याचे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह विभक्त होऊन तो शुद्धसत्व अवस्थेत जगू लागतो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा