रविवार, ८ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

             " तुमच्या प्रेमाने, परमेश्वराला तुमच्याशी बोलण्यास भाग पाडले पाहिजे." 
 
प्रकरण सहा 

मंत्र 

                   स्वामींनी मला माझे काही अनुभव लिहिण्यास सांगितले. त्या अनुभवांचेच इथेच, याक्षणी, मुक्ती या मालिकेतील भाग -३ हे पुस्तक मूर्तरूपात आले. लिहित असताना त्यांनी, माझ्या संपूर्ण जीवनाची वाटचाल वेदांच्या मार्गावरून झाली हे दर्शविण्यासाठी वेदांमधील काही उदाहरणे दिली. त्यांनी मला ते पुस्तक तीन भागात लिहिण्यास सांगितले. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. माझे सर्व अनुभव, भाव आणि विचार हे वेदच असल्याचे स्वामींनी मला स्पष्ट करून सांगितले. मला वेद माहित नाहीत. मी ते वाचलेही नाहीत. परंतु स्वामी म्हणाले, की मी माझ्या संपूर्ण जीवनाची वाटचाल वेदांमध्ये सांगितलेल्या मार्गावरूनच केली आहे. 
                 पुढे स्वामींनी मला भगवद्गीतेवर पुस्तक लिहिण्यास सांगितले आणि माझ्या अनुभवांच्या सहाय्याने त्यातील श्लोकांचे स्पष्टीकरण करण्यास सांगितले. लिहित असताना माझ्या असे लक्षात आले की गीतेमध्ये दिलेल्या मार्गाचे मी तंतोतंत अनुसरण केले आहे. मी नकळत माझे जीवन, गीता आणि वेद ह्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून व्यतीत केले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा