ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" इंद्रियांकडे धाव घेणाऱ्या मनाला वैराग्याद्वारे दुसरीकडे वाळवा. ही इंद्रिये शाश्वत आनंदाचे शत्रू आहेत."
प्रकरण सहा
मंत्र
वैश्विक मुक्तीसाठी मी सतत विलाप करत होते. पुस्तकरूपातून मी माझे भाव व्यक्त केले आहेत. स्वामींनी मला उपनिषदांच्या पलीकडे, ब्रम्हसूत्र, प्रेमसूत्र आणि आनंदसूत्र लिहिण्यास सांगितले. ही पुस्तके लिहीत असताना माझ्या असे लक्षात आले की माझ्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावकल्लोळामधून स्वामी साधकास प्राप्त होणाऱ्या विविध अवस्था दाखवत होते. त्यांनी प्रत्येक स्थिती दाखवून सांगितले, " हे भाव आणि गुण वेदांसाठी समर्पक आहेत, तसेच ते भाव आणि ते गुण गीतेसाठी समर्पक आहेत." स्वामी मला सर्व सांगतात आणि मी लिहिते. अशा पद्धतीनेच मी ' उपनिषदांच्या पलीकडे ' आणि इतर सर्व पुस्तके लिहिली.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा