गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेमाविना जीवन म्हणजे मृत्युच."

प्रकरण सहा 

मंत्र 

                परमेश्वर हा वेद उपनिषदे आणि ब्रम्हसूत्र यांचा मूलस्त्रोत आहे. त्यांच्यापासून सर्वांची निर्मिती झाली आहे. सर्वांचा केंद्रबिंदू असलेल्या त्यालाच मी घट्ट पकडून ठेवले आहे. त्यामुळे आपोआपच प्रत्येक गोष्ट माझ्याकडे येते. मी परमेश्वराकडे एकाग्रतेने वाटचाल करत असल्यामुळे ग्रंथ हेच माझा मार्ग बनले. मी मार्गही पाहिला नाही आणि जगाकडेही बघितले नाही ; कारण माझी दृष्टी केवळ माझ्या ध्येयावर, म्हणजेच परमेश्वरावर स्थिर होती. सर्वांचा केंद्रबिंदू असणाऱ्या परमेश्वराला आपण धरून ठेवले पाहिजे. एवढेच पुरेसे आहे. वेद आणि उपनिषदांचा अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही. ते आपोआपच आपला स्थायीभाव बनून जातील. हे माझ्या जीवनाच्या उदाहरणाद्वारे  दाखवण्यात आले आहे. उच्च साधनेतून जीवात्मा परमात्मा बनतो. तिचे ( जीवाचे )अनुभव, तिचे भाव, तिचे विचार हेच वेद, उपनिषदे आणि ब्रम्हसूत्र बनून जातात. 
               ह्या अवस्थेत माझे सर्व विचार केवळ वैश्विक मुक्ती आणि स्वामींशी होणारा माझा सदेह योग ह्या दोनच विषयांवर केंद्रित आहेत. केवळ या दोन्हींनीच माझे मन व्यापून टाकले आहे.
               नुकतेच एका व्यक्तीने मला म्हटले," तुम्ही तुमच्या मनाला वाटेल ते लिहा ; परंतु त्याचा स्वामींशी संबंध जोडू नका,"
               स्वामींशिवाय मी कसे काय लिहू शकेन ? खरं तर स्वामींच हे सर्व लिहीत आहेत. माझ्या प्रत्येक वाक्यात स्वामी आहेत. तुम्हाला कोणी श्वास घेऊ नका असे सांगितले तर ते शक्य आहे का ? स्वामी माझा श्वास आहेत. अंतिम श्वास घेतल्यानंतरच माझे स्वामींविषयीचे विचार थांबतील.
               

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा