गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " तुमची दैनंदिन कर्म, परमेश्वराला समर्पित केल्याच्या भावनेतून करून पवित्र बनवा."

प्रकरण सहा 

मंत्र 

                 २००४ मध्ये ' उपनिषदांच्या पलीकडे ' लिहित असताना मी स्वतःला संपूर्णपणे रिक्त करून स्वामींना  सर्व काही अर्पण केले  त्यानंतर त्यांनी परमेश्वराचे सत्य माझ्यामध्ये भरले. मी कोणत्या अवस्थेत आहे याविषयीची जाणीव नसलेल्या स्थितीत मी आहे ही स्थिती म्हणजे ' मी ' विना ' मी '. 
                 मी एक सर्वसामान्य खेडूत स्त्री आहे जिला बाहेरच्या जगाविषयी काहीही माहिती नाही. मी केवळ एकच गोष्ट केली ती म्हणजे परमेश्वरासाठी अश्रू ढाळणे. जर मी त्याला प्राप्त करू शकले नाही तर माझा हा जन्म व्यर्थ आहे. ' मला स्वामी हवेत, मला स्वामी हवेत. असे म्हणून मी नेहमीच रडत असते, आक्रोश करत असते. मला दुसरे काहीही नको.'
                माझ्या जन्मापासून मला परमेश्वराच्या दर्शनाची तृष्णा आहे; ही तृष्णा माझ्या हृदयाच्या गाभ्यापासून निर्माण झाली आहे. मला सत्याची प्राप्ती झाली आहे, तथापि मला हे माहिती नाही. यालाच म्हणतात, ' मी ' विना ' मी ' स्थिती. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा