रविवार, ३० जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " सर्वांवर प्रेम करा, परंतु एका विशिष्ट व्यक्तीवर विशेष ममत्व नको." 
 
प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

माझ्या प्रिय प्रभूंच्या दिव्य चरणकमली,
अनंत कोटी प्रणाम !
                प्रभू, स्वामी माझ्या जीवना, माझ्या आत्म्याशी योग झालेला प्रभूपरमेशा ! 
                मधुर अमृत ! पादुका पीठावर विभूती, हळद, कुंकू, उदी यांचा कृपावर्षाव करणाऱ्या माझ्या प्रभूंना माझा नमस्कार ! प्रभू, मला पुन्हा जन्म नाही, असा वर तुम्ही दिला आहे. परंतु तुम्ही जेव्हा प्रेमसाई बनून याल तेव्हा पुन्हा जन्म घ्यावा अशी माझी अनिवार इच्छा आहे. तेव्हासुद्धा तुम्ही ब्रम्हचारीच असणार का ? वास्तविक तुम्ही सनातन ब्रम्हचारी आहात.
                जेव्हा तुम्ही प्रेमसाई बनून याल तेव्हा जर रामकृष्णांच्या शारदादेवींप्रमाणे तुम्ही माझा तुमची देवी ( अर्धांगिनी ) म्हणून स्वीकार करणार असाल तरच मला पुन्हा जन्म मिळो अन्यथा मला यायचे नाही. प्रभू ! हे महाप्रभो ! तुम्ही मला जिंकलेत. माझ्या मनात संघर्ष चालू आहे , मी तुम्हाला क्षणभरही विसरू नाही. तुम्ही माझ्याशी का बोलत नाही ? मला दर्शन का देत नाही ? स्वामी, मला तुमचे प्रत्यक्ष दर्शन व संभाषण कधी मिळेल ? स्वामी, माझ्यावर कृपा करा. या, या आणि मला दर्शन द्या. माझ्याशी संभाषण करा. हे मूकनाट्य कशासाठी ? तुम्हाला पाहिले की माझे शब्दच हरवतात. जर तुम्ही बोलला नाहीत तर कसे काय ? प्रभू ! दयासागरा ! कृपा करा आणि मला लवकरात लवकर प्रत्यक्ष दर्शन द्या. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची प्रिय मीरा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, २७ जुलै, २०१७

ॐ  श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " दुसऱ्याप्रती असलेले सामान्य प्रेम हे खरे प्रेम नव्हे मनुष्य आनंद आणि प्रेम यासाठी आसुरलेला  असतो व ते त्याला दुसऱ्यांकडून प्राप्त होईल असा त्याचा समाज असतो वस्तुतः प्रेम हे प्रत्येकाच्या आतून पाझरते."

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

१ जानेवारी १९९५ 
माझ्या प्रिय प्रभूंच्या दिव्य चरणकमली, 
अनंत कोटी प्रणाम !
              स्वामी, माझ्या जीवना, माझ्याविषयी ही  अनास्था का ? मी कोणती चूक केलीय ? मला असं वाटतंय की तुम्ही मला सोडून देताय. पूर्वीसारखा विभूतीचा सुगंध येत नाही. तुमच्या फोटोतून विभूती पडत नाही. तुम्ही स्वप्नामध्ये वरचेवर दर्शनही देत नाही, तुमच्या अस्तित्वाची अनुभूतीही देत नाही. काय कारण आहे ? मी तुमचा विचार करकरून अश्रू ढळते आहे. आज मला टि.व्ही. वर एक सेकंड तुमचे दर्शन झाले. किमान ते तरी तुम्ही लांबवायचे होते. का बरं तुम्ही मला इतका त्रास देताय ? मला तुमचा विसर पडावा असे तुम्हाला वाटतेय का ? मला तुमचा कसा विसर पडेल ? तुमचे विस्मरण झाले तर मी जिवंत तरी राहीन का ? हे जर खरे असेल की तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही कान्हा आहात तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. जगातील सर्वजण आनंदात आहेत आणि मी एकटीच का बरं रडते आहे ? तुम्हीच मला तुमच्याविषयी सांगितलेत. तुम्हाला क्षणभरही न विसरण्याची माझी मनःस्थिती आणि त्यामुळे मला होणार त्रास यास तुम्हीच कारणीभूत आहात. कृपा करून माझ्या स्वप्नात या आणि मला आनंद द्या. मी तुमची मीरा आहे हे जर सत्य असेल तर मला दर्शन द्या. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची प्रिय मीरा 

***

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २३ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " प्रेम आणि त्याग हे दोन समांतर रेषांसारखे आहेत. प्रेमाद्वारे त्यागभाव वृद्धिंगत होतो व त्यागाद्वारे प्रेमभाव वृद्धिंगत होतो." 

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

२१ डिसेंबर १९९४ 
माझ्या प्रेमभगवानांच्या दिव्य चरणकमली 
अनंत कोटी प्रणाम !
              स्वामी, माझ्या जीवना, प्रभू, कान्हा, पुट्टपर्तीत तुम्ही माझ्यावर केलेल्या कृपावर्षावाची मी कशी परतफेड करू ? गेल्या वर्षी होम केला, त्यावेळी तुम्ही आला नाहीत. परंतु यावर्षी तुम्ही आमच्या * षष्ट्याद्विपूर्ति विवाह सोहळ्यासाठी आलात. तुम्ही होमाचा अग्नी दोनदा आशीर्वादित केलात. तुम्ही तुमच्या सुवर्णहस्तांनी पूर्णाहुती दिलीत. हे सर्व तुम्ही तुमच्या मीरेसाठी केलेत. तुम्ही विवाहसोहळासुद्धा संपन्न केलात. दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्व जोडप्यांना पादनमस्कार दिलात. गेल्यावर्षी आम्ही एकेकाने पादनमस्कार घेतला आणि ह्यावर्षी तुम्ही आपल्या विवाहनिमित्त जोडप्यांना पादनमस्कार दिलात. 
श्रीमन् नारायण शरणो शरनम प्रपद्यते 
               असे म्हणत मी तुमच्या दिव्य चरणांशी शरणागत झाले आणि चरण घट्ट धरून ठेवले. तुम्ही म्हणाला, " अनेक लोकं प्रतीक्षा करत आहेत." अनेक लोक तुमच्या दर्शनाची प्रतीक्षा करत आहेत, असे तुम्हाला म्हणायचे होते ? का अनेक लोक आपल्याकडे पाहत आहेत असे म्हणायचे होते ? मला माहीत नाही. 
               तुम्ही माझ्याशी संभाषण करावे. या माझ्या अविरत प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून तुम्ही हे माझ्याशी बोललात का ? मी म्हणाले की मला तुमच्या दिव्य चरणांवरील शंख, चक्र दाखवा ; परंतु तुम्ही मला तुमच्या दिव्य निवासासमोर तुमच्या दिव्य चरणांभोवती काढलेली शंखचक्राची पुष्परंगावली दाखवलीत. मला तुमच्या दैवी चरणांचे चुंबन घेण्याचे सद् भाग्य लाभले नाही. ही पुस्तके कोणीही न वाचता देवघरात ठेवून देण्यासाठी तुम्ही छापून घेतली आहेत का ? ही पुस्तके वाचून सर्वांना त्याचा लाभ व्हायला नको का ? कृपा करून एका महिन्यात ही सर्व पुस्तके विकली जावीत, यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. 
             ही तुमची जबाबदारी आहे. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची प्रिय मीरा 

* षष्ट्याद्विपूर्ति विवाह - तामिळनाडूमध्ये पतीच्या वयास ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुन्हा एकदा विधिपूर्वक विवाह केला जातो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

         

गुरुवार, २० जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " जर एखाद्यास तुम्ही तुमचा शत्रू मानलेत तर तो विचार त्याच्या मनात प्रतिबिंबीत होईल आणि तो ही तुम्हाला तुपाचा शत्रू मानेल."

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

२६ नोव्हेंबर १९९४ 
माझ्या प्रिय प्रभूंच्या दिव्य चरणकमली
अनंत कोटी प्रणाम ! 
          स्वामी, भगवान!
               तुमच्या जन्मदिनी, तुमची तब्येत ठीक नसल्याचे काल मी पेपरमध्ये वाचले. स्वामी तुम्हाला काय झालं ? माझ्यामुळे, या पापिणीमुळे तर तुम्हाला काही झालं नाही ना ? कारण तुम्ही तिथे अगदी आनंदात आहात असे मी लिहिले होते. त्यामुळे तर नाही ना ? माझ्या वाईट पूर्वकर्मांमुळे हे घडले का ? प्रभू, कृपा करून मला क्षमा करा. तुम्हाला अजिबात त्रास होऊ नये, मला हे सहनच होत नाही. तुम्ही माझ्यावर रागावलात का ? जर मी काही चुकीचे लिहिले असेल, तर कृपा करून मला क्षमा करा. मी कसे वागावे हेच मला कळत नाही. कृपा करून या अशिक्षित स्त्रीला क्षमा करा. मला तुमच्या तब्येतीविषयी पत्रातून कळवा. तुम्ही बरे आहात ना ते कळवा. 
                माझ्यावर कृपा करा आणि मला अढळ प्रेमभक्ती प्रदान करा. माझे मन खंबीर बनवा. 
                स्वामी ! स्वामी ! मी हे सर्व लिहिलेले चुकीचे आहे का ? मी तुमच्याशी बोलण्याची एवढी मोकळीक घेत आहे, ते चुकीचे आहे का ? कृपा करून मला सांगा ना. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची प्रिय मीरा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १६ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

             " जर एखाद्याने तुम्हास इजा पोहचवली तर त्या बदल्यात तुम्ही त्याला इजा पोहचवू नका जर त्याऐवजी आपण प्रेम दिले तर मनातील दुर्भाव नाहीसे होतील." 

प्रकरण नऊ

साधनापथावरील पत्रे

१ ऑगस्ट १९९९४ 
माझ्या प्रिय प्रेममूर्तींच्या दिव्य चरणकमली,
अनंत कोटी प्रणाम !
               स्वामी , अनेक दिवसांपासून मी तुमच्या दिव्य चरणांचा ध्यासच घेतला आहे . एखाद्या ऋणकोप्रमाणे , तुम्हाला काळजी वाटली आणि तुम्ही पादुका दिल्यात . साधारणपणे , ऋणको हप्त्यांमध्ये व्याज देतो . तथापि तुम्ही प्रथम मुद्दलच दिलेत ! त्यानंतर परमकुडीमध्ये तुम्ही व्याज म्हणून तुमचे दिव्य नाम दिलेत . परमकुडीमध्ये तुम्ही माझ्या हातावर विभूतीचा वर्षाव केलात आणि अधिक व्याज दिलेत . शेवटी पर्तीमध्ये तुम्ही पादनमस्काराद्वारे स्वतःलाच देऊन टाकलेत . तुम्ही अगदी प्रेमवेडा परमेश्वर आहात ! एवढेही तुम्हाला पुरेसे वाटले नाही म्हणून तुम्ही तुमच्या फोटोवर विभूती सृजित केलीत . तेही पुरेसे वाटले नाही म्हणून कृपा वर्षाव करून माझ्या गीतांचे पुस्तक प्रकाशित केलेत . विशेषतः या कलीयुगात तुमच्यासारखा दुसरा प्रेमवेडा देव आम्ही पहिला नाही . 
हे प्रेमवेड्या परमेशा ! 
हे कृपावंत !
माझा पिता , आश्रयस्थान माझे 
रक्षा करोत माझी , दिव्यचरण तुमचे 
दिव्य महिमा तुमच्या दया करुणेचा 
तुमची प्राप्ती , सौभाग्य हे माझे 
लोक समस्ता सुखिनो भवन्तु 

तुमची प्रिय बालिका 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १३ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " तोंडातून येणार प्रत्येक शब्द, आपण आपले जीवन कसे जगू हे निर्धारित करतो. " 

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

८ जुलै १९९४ 
माझ्या प्रेममूर्तींच्या दिव्य चरणकमली 
कोटी कोटी प्रणाम ... 
            स्वामी, हे भगवंता, 
            मी एक सेकंदही तुम्हाला विसरू शकत नाही. तुम्ही अशी काय जादू केलीत की ज्यामुळे तुमचे दिव्य चरण सदैव माझ्या डोळ्यसमोर आहेत. सर्वजण म्हणतात, की त्यांना सदासर्वकाळ ईश्वराचे स्मरण होऊ शकत नाही. मी तर परमेश्वराला विसरू शकत नाही. मला तुमचे चरण घट्ट धरून ठेवता येतील का ? चुंबन घेता येईल का ? स्वामी, कृपा करून मला तुमच्या दिव्य चरणांवर लोळण घेऊन पुन्हा पुन्हा त्यांचे चुंबन घेण्याची अनुमती द्या, माझ्या मस्तकावर तुम्ही हात ठेवा. स्वामी, कृपा करून तुमचे दिव्य चरण माझ्या मस्तकावर ठेवा. मला फक्त एवढेच हवे आहे, दुसरे काहीही नको. मला फक्त तुमचे दिव्य चरण हवेत. मला तुम्ही का एवढं वेड लावलंत ? मी सदैव तुमच्या विचारांमध्ये अश्रू ढाळत असते. तुम्ही माझ्यावर कृपावर्षाव कधी करणार ? 
             स्वामी, माझ्या विनवण्या तुमच्या कानापर्यंत पोहचत नाहीत का ? माझ्या अश्रूंनी तुमच्या हृदयाला पाझर फुटत नाही का ? मीच एकटी का अशी आहे ? मलाच हे का हवे आहे ? जर मी तुम्हाला किंवा तुमच्या दिव्य चरणांना स्पर्श केला, तर तुमचे काही नुकसान होणार आहे का ? कृपा करून मला स्वप्नात तरी पादनमस्कार द्या. माझ्या मनातील भक्तीभाव वृद्धींगत होऊ द्या. क्षणोक्षणी तुमच्या निकट सान्निध्याचा आनंद घेण्यासाठी मला आशीर्वाद द्या. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची दिव्य बालिका 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम
 

रविवार, ९ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " ज्या विश्वासाने तुम्ही सोनाराकडे सोने देता, त्याच विश्वासाने तुमचे मन गुरूंच्या हाती सोपवा. गुरूंना कदाचित तुमच्या मनाला वितळवण्याची, मुशीत घालून आकार देण्याची वा ठाकून ठोकून घडवण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु अजिबात काळजी करू नका. ते तुमच्या मनाला एखाद्या मूल्यवान रत्नाप्रमाणे बनवून परत देतील." 

     गुरु महिमा
 
 
              आज गुरुपौर्णिमा, आपल्यासाठी अत्यंत मंगल दिवस. आपल्या गुरु श्री वसंतसाई, आपल्या सर्वांच्या अम्मा ह्यांच्या चरणी कमली कोटी कोटी प्रणाम ! अम्मा खरोखरच एक आगळ्या वेगळ्या गुरु आहेत. आपल्यासाठी त्या गुरुस्थानी आहेत. आपण कशासाठी जन्म घेतला, ते उद्दीष्ट गाठण्यासाठी संसारात राहूनही मनुष्याने कसे जीवन जगावे ह्या विषयीच्या ज्ञानाचे भांडार आपल्यासाठी खुले केले आणि ते ही स्वतःच्या जीवानुभवातून ! त्या आगळ्या वेगळ्या का आहेत हे त्यांच्या खाली दिलेल्या लिखाणातून आपल्या लक्षात येईल. 
अम्मा म्हणतात, 
                " माझ्या लहान वयापासून मी सर्वांकडून धडे शिकत आहे. मी इतरांच्या चांगल्या सवयी पाहून त्या आत्मसात करत असे. ह्याच कारणामुळे मी सर्वांना माझे गुरु मानते. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी स्वामींकडे वैश्विक मुक्ती मागितली. सर्वांना गुरुदक्षिणा म्हणून मुक्ती द्यायची आहे. त्या सर्वांना मी गुरु मानते आणि मी तर केवळ शिष्य आहे. सर्वांपुढे मी विनयशील व विनम्र आहे. जर कोणी माझ्यामधील दोष दाखवले तर मी कधीही त्यांच्याबरोबर वादविवाद करत नाही उलट त्यांची क्षमा मागते. मी कधीही माझे बरोबर आहे असे सांगून माझा दृष्टिकोन इतरांवर लादत नाही. गांधीजींनी जसा देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढा दिला व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तसा मी प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी भगवंताशी लढा देत आहे व मी प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळवून देईन !" 

वैश्विक मुक्ती प्रदायिनी, वैश्विक मुक्ती प्रदायिनी
वसंतसाई मैय्या 
ॐ जय जय साई माँ 

जय साईराम 

 

गुरुवार, ६ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "

प्रकरण नऊ  

साधनापथावरील पत्रे 

२७ नोव्हेंबर १९९१
माझ्या प्रिय भगवानांच्या दिव्य चरणकमली ,
                        अनंत कोटी प्रणाम ! 
स्वामी, 
                 अशोकवनातील सीतेप्रमाणे मी रोज तुमच्या बोलवण्याची प्रतीक्षा करते आहे. मी चिंताक्रांत असताना मला श्री. चेट्टियारांचे पत्र मिळाले, जसा काही हनुमानाचा संदेश ! मी त्वरेने जाऊन पादुकांचे दर्शन घेतले. हनुमानाने सीतेला जशी अंगठी दिली तशा चेट्टियारांना मला पादुका दिल्या. पादुकांच्या आगमनाने मी आनंदात न्हाऊन निघाले. काल पैसे पाठवल्यांनंतर पादुका आमच्या झाल्या.  प्रभू, आता लवकरच तुम्ही तुमचे दिव्य चरण त्यावर ठेवा. 
               स्वामी, तुमच्या कृपेने माझे हृदय आनंदाने तुडुंब भरून गेले आहे. तुम्हीच ते ' ज्ञानभूमी ' नावाचे मासिक माझ्या हातात पडेल अशी व्यवस्था केलीत. मला चेट्टियारांचा पत्ता दिलात, मला त्यांच्या घरी पाठवलंत. त्यांची ओळख करून दिलीत. मला तुमच्या पादुकांचे दर्शन घडवलेत. ' मलाही अशा पादुका मिळाव्यात ' अशी तीव्र इच्छा निर्माण केलीत. तुम्हीच मला पादुकांची ऑर्डर नोंदवायला प्रवृत्त केलेत आणि आज मला पादुका मिळाल्या. आता तुम्हीच आम्हाला पर्तीला बोलावून तुमच्या दिव्य चरणस्पर्शानी पादुका पुनीत करायला हव्यात. 
तुम्ही मला दर्शन, स्पर्शन, संभाषण तिन्हीचा लाभ द्यायला हवा. 
तुमची कृपा चिरायु राहो !
तुमचा महिमा चिरायु होवो !
स्वामी, स्वामी प्रत्येक क्षणी मी तुमच्या निकट सान्निध्याचा, तुमच्या 
कृपेचा मनमुराद आंनद लुटते आहे. 
तुमची प्रेमळ बालिका 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे." 

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

१६ नोव्हेंबर १९९० 
               माझ्या प्रेममूर्तीच्या दिव्य चरणी 
कोटी कोटी प्रणाम.... 
प्रिय स्वामी, 
               प्रत्येक क्षणी मला तुमचे सामीप्य जाणवते. आज सकाळी मी वकीलांकडे गेले होते. ते मला म्हणाले, *" तुम्ही कोर्टात असे सांगा की तुमच्या वडीलांना चांगले ऐकू येत होते." मला खूप दुःख झाले. मी अखंड तुमचा धाव करत होते. प्रार्थना करत होते." कृपा करून माझ्यावर असत्य कथन करण्याची वेळ येऊ देऊ नका. हा प्रश्न कोर्टात विचारला जाऊ नये." तो प्रश्न विचारलाच गेला नाही. 
              बाबा, माझ्या जीवा ! माझा प्रतिज्ञाभंग होऊ नये यासाठी तुम्ही मला कशी मदत केलीत ! माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत नेहमी सत्य बोलण्याची माझी प्रतिज्ञा पाळली जावी यासाठी मला आशीर्वाद द्या. तुम्ही माझ्याजवळ असताना मला भीती कशाची ? 

सदैव तुमची बालिका 
वसंता 

* पेन्शन आणण्यासाठी सायकलवरून शहरात जात असताना माझ्या वडीलांचा अपघात झाला. त्यांना बसने धक्का दिला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे निधन झाले. ही घटना १९८९ मध्ये घडली. पोलिसांनी त्या बस कंपनीवर खटला भरला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम