रविवार, २३ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " प्रेम आणि त्याग हे दोन समांतर रेषांसारखे आहेत. प्रेमाद्वारे त्यागभाव वृद्धिंगत होतो व त्यागाद्वारे प्रेमभाव वृद्धिंगत होतो." 

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

२१ डिसेंबर १९९४ 
माझ्या प्रेमभगवानांच्या दिव्य चरणकमली 
अनंत कोटी प्रणाम !
              स्वामी, माझ्या जीवना, प्रभू, कान्हा, पुट्टपर्तीत तुम्ही माझ्यावर केलेल्या कृपावर्षावाची मी कशी परतफेड करू ? गेल्या वर्षी होम केला, त्यावेळी तुम्ही आला नाहीत. परंतु यावर्षी तुम्ही आमच्या * षष्ट्याद्विपूर्ति विवाह सोहळ्यासाठी आलात. तुम्ही होमाचा अग्नी दोनदा आशीर्वादित केलात. तुम्ही तुमच्या सुवर्णहस्तांनी पूर्णाहुती दिलीत. हे सर्व तुम्ही तुमच्या मीरेसाठी केलेत. तुम्ही विवाहसोहळासुद्धा संपन्न केलात. दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्व जोडप्यांना पादनमस्कार दिलात. गेल्यावर्षी आम्ही एकेकाने पादनमस्कार घेतला आणि ह्यावर्षी तुम्ही आपल्या विवाहनिमित्त जोडप्यांना पादनमस्कार दिलात. 
श्रीमन् नारायण शरणो शरनम प्रपद्यते 
               असे म्हणत मी तुमच्या दिव्य चरणांशी शरणागत झाले आणि चरण घट्ट धरून ठेवले. तुम्ही म्हणाला, " अनेक लोकं प्रतीक्षा करत आहेत." अनेक लोक तुमच्या दर्शनाची प्रतीक्षा करत आहेत, असे तुम्हाला म्हणायचे होते ? का अनेक लोक आपल्याकडे पाहत आहेत असे म्हणायचे होते ? मला माहीत नाही. 
               तुम्ही माझ्याशी संभाषण करावे. या माझ्या अविरत प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून तुम्ही हे माझ्याशी बोललात का ? मी म्हणाले की मला तुमच्या दिव्य चरणांवरील शंख, चक्र दाखवा ; परंतु तुम्ही मला तुमच्या दिव्य निवासासमोर तुमच्या दिव्य चरणांभोवती काढलेली शंखचक्राची पुष्परंगावली दाखवलीत. मला तुमच्या दैवी चरणांचे चुंबन घेण्याचे सद् भाग्य लाभले नाही. ही पुस्तके कोणीही न वाचता देवघरात ठेवून देण्यासाठी तुम्ही छापून घेतली आहेत का ? ही पुस्तके वाचून सर्वांना त्याचा लाभ व्हायला नको का ? कृपा करून एका महिन्यात ही सर्व पुस्तके विकली जावीत, यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. 
             ही तुमची जबाबदारी आहे. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची प्रिय मीरा 

* षष्ट्याद्विपूर्ति विवाह - तामिळनाडूमध्ये पतीच्या वयास ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुन्हा एकदा विधिपूर्वक विवाह केला जातो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा