ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सर्वांवर प्रेम करा, परंतु एका विशिष्ट व्यक्तीवर विशेष ममत्व नको."
प्रकरण नऊ
साधनापथावरील पत्रे
माझ्या प्रिय प्रभूंच्या दिव्य चरणकमली,
अनंत कोटी प्रणाम !
प्रभू, स्वामी माझ्या जीवना, माझ्या आत्म्याशी योग झालेला प्रभूपरमेशा ! मधुर अमृत ! पादुका पीठावर विभूती, हळद, कुंकू, उदी यांचा कृपावर्षाव करणाऱ्या माझ्या प्रभूंना माझा नमस्कार ! प्रभू, मला पुन्हा जन्म नाही, असा वर तुम्ही दिला आहे. परंतु तुम्ही जेव्हा प्रेमसाई बनून याल तेव्हा पुन्हा जन्म घ्यावा अशी माझी अनिवार इच्छा आहे. तेव्हासुद्धा तुम्ही ब्रम्हचारीच असणार का ? वास्तविक तुम्ही सनातन ब्रम्हचारी आहात.
जेव्हा तुम्ही प्रेमसाई बनून याल तेव्हा जर रामकृष्णांच्या शारदादेवींप्रमाणे तुम्ही माझा तुमची देवी ( अर्धांगिनी ) म्हणून स्वीकार करणार असाल तरच मला पुन्हा जन्म मिळो अन्यथा मला यायचे नाही. प्रभू ! हे महाप्रभो ! तुम्ही मला जिंकलेत. माझ्या मनात संघर्ष चालू आहे , मी तुम्हाला क्षणभरही विसरू नाही. तुम्ही माझ्याशी का बोलत नाही ? मला दर्शन का देत नाही ? स्वामी, मला तुमचे प्रत्यक्ष दर्शन व संभाषण कधी मिळेल ? स्वामी, माझ्यावर कृपा करा. या, या आणि मला दर्शन द्या. माझ्याशी संभाषण करा. हे मूकनाट्य कशासाठी ? तुम्हाला पाहिले की माझे शब्दच हरवतात. जर तुम्ही बोलला नाहीत तर कसे काय ? प्रभू ! दयासागरा ! कृपा करा आणि मला लवकरात लवकर प्रत्यक्ष दर्शन द्या.
लोका समस्ता सुखिनो भवन्तु
तुमची प्रिय मीरा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा