ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" दुसऱ्याप्रती असलेले सामान्य प्रेम हे खरे प्रेम नव्हे मनुष्य आनंद आणि प्रेम यासाठी आसुरलेला असतो व ते त्याला दुसऱ्यांकडून प्राप्त होईल असा त्याचा समाज असतो वस्तुतः प्रेम हे प्रत्येकाच्या आतून पाझरते."
प्रकरण नऊ
साधनापथावरील पत्रे
माझ्या प्रिय प्रभूंच्या दिव्य चरणकमली,
अनंत कोटी प्रणाम !
स्वामी, माझ्या जीवना, माझ्याविषयी ही अनास्था का ? मी कोणती चूक केलीय ? मला असं वाटतंय की तुम्ही मला सोडून देताय. पूर्वीसारखा विभूतीचा सुगंध येत नाही. तुमच्या फोटोतून विभूती पडत नाही. तुम्ही स्वप्नामध्ये वरचेवर दर्शनही देत नाही, तुमच्या अस्तित्वाची अनुभूतीही देत नाही. काय कारण आहे ? मी तुमचा विचार करकरून अश्रू ढळते आहे. आज मला टि.व्ही. वर एक सेकंड तुमचे दर्शन झाले. किमान ते तरी तुम्ही लांबवायचे होते. का बरं तुम्ही मला इतका त्रास देताय ? मला तुमचा विसर पडावा असे तुम्हाला वाटतेय का ? मला तुमचा कसा विसर पडेल ? तुमचे विस्मरण झाले तर मी जिवंत तरी राहीन का ? हे जर खरे असेल की तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही कान्हा आहात तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. जगातील सर्वजण आनंदात आहेत आणि मी एकटीच का बरं रडते आहे ? तुम्हीच मला तुमच्याविषयी सांगितलेत. तुम्हाला क्षणभरही न विसरण्याची माझी मनःस्थिती आणि त्यामुळे मला होणार त्रास यास तुम्हीच कारणीभूत आहात. कृपा करून माझ्या स्वप्नात या आणि मला आनंद द्या. मी तुमची मीरा आहे हे जर सत्य असेल तर मला दर्शन द्या.
लोका समस्ता सुखिनो भवन्तु
तुमची प्रिय मीरा
***
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा