ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तोंडातून येणार प्रत्येक शब्द, आपण आपले जीवन कसे जगू हे निर्धारित करतो. "
प्रकरण नऊ
साधनापथावरील पत्रे
माझ्या प्रेममूर्तींच्या दिव्य चरणकमली
कोटी कोटी प्रणाम ...
स्वामी, हे भगवंता, मी एक सेकंदही तुम्हाला विसरू शकत नाही. तुम्ही अशी काय जादू केलीत की ज्यामुळे तुमचे दिव्य चरण सदैव माझ्या डोळ्यसमोर आहेत. सर्वजण म्हणतात, की त्यांना सदासर्वकाळ ईश्वराचे स्मरण होऊ शकत नाही. मी तर परमेश्वराला विसरू शकत नाही. मला तुमचे चरण घट्ट धरून ठेवता येतील का ? चुंबन घेता येईल का ? स्वामी, कृपा करून मला तुमच्या दिव्य चरणांवर लोळण घेऊन पुन्हा पुन्हा त्यांचे चुंबन घेण्याची अनुमती द्या, माझ्या मस्तकावर तुम्ही हात ठेवा. स्वामी, कृपा करून तुमचे दिव्य चरण माझ्या मस्तकावर ठेवा. मला फक्त एवढेच हवे आहे, दुसरे काहीही नको. मला फक्त तुमचे दिव्य चरण हवेत. मला तुम्ही का एवढं वेड लावलंत ? मी सदैव तुमच्या विचारांमध्ये अश्रू ढाळत असते. तुम्ही माझ्यावर कृपावर्षाव कधी करणार ?
स्वामी, माझ्या विनवण्या तुमच्या कानापर्यंत पोहचत नाहीत का ? माझ्या अश्रूंनी तुमच्या हृदयाला पाझर फुटत नाही का ? मीच एकटी का अशी आहे ? मलाच हे का हवे आहे ? जर मी तुम्हाला किंवा तुमच्या दिव्य चरणांना स्पर्श केला, तर तुमचे काही नुकसान होणार आहे का ? कृपा करून मला स्वप्नात तरी पादनमस्कार द्या. माझ्या मनातील भक्तीभाव वृद्धींगत होऊ द्या. क्षणोक्षणी तुमच्या निकट सान्निध्याचा आनंद घेण्यासाठी मला आशीर्वाद द्या.
लोका समस्ता सुखिनो भवन्तु
तुमची दिव्य बालिका
वसंता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा