रविवार, २ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे." 

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

१६ नोव्हेंबर १९९० 
               माझ्या प्रेममूर्तीच्या दिव्य चरणी 
कोटी कोटी प्रणाम.... 
प्रिय स्वामी, 
               प्रत्येक क्षणी मला तुमचे सामीप्य जाणवते. आज सकाळी मी वकीलांकडे गेले होते. ते मला म्हणाले, *" तुम्ही कोर्टात असे सांगा की तुमच्या वडीलांना चांगले ऐकू येत होते." मला खूप दुःख झाले. मी अखंड तुमचा धाव करत होते. प्रार्थना करत होते." कृपा करून माझ्यावर असत्य कथन करण्याची वेळ येऊ देऊ नका. हा प्रश्न कोर्टात विचारला जाऊ नये." तो प्रश्न विचारलाच गेला नाही. 
              बाबा, माझ्या जीवा ! माझा प्रतिज्ञाभंग होऊ नये यासाठी तुम्ही मला कशी मदत केलीत ! माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत नेहमी सत्य बोलण्याची माझी प्रतिज्ञा पाळली जावी यासाठी मला आशीर्वाद द्या. तुम्ही माझ्याजवळ असताना मला भीती कशाची ? 

सदैव तुमची बालिका 
वसंता 

* पेन्शन आणण्यासाठी सायकलवरून शहरात जात असताना माझ्या वडीलांचा अपघात झाला. त्यांना बसने धक्का दिला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे निधन झाले. ही घटना १९८९ मध्ये घडली. पोलिसांनी त्या बस कंपनीवर खटला भरला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा