ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर एखाद्यास तुम्ही तुमचा शत्रू मानलेत तर तो विचार त्याच्या मनात प्रतिबिंबीत होईल आणि तो ही तुम्हाला तुपाचा शत्रू मानेल."
प्रकरण नऊ
साधनापथावरील पत्रे
माझ्या प्रिय प्रभूंच्या दिव्य चरणकमली
अनंत कोटी प्रणाम !
स्वामी, भगवान!तुमच्या जन्मदिनी, तुमची तब्येत ठीक नसल्याचे काल मी पेपरमध्ये वाचले. स्वामी तुम्हाला काय झालं ? माझ्यामुळे, या पापिणीमुळे तर तुम्हाला काही झालं नाही ना ? कारण तुम्ही तिथे अगदी आनंदात आहात असे मी लिहिले होते. त्यामुळे तर नाही ना ? माझ्या वाईट पूर्वकर्मांमुळे हे घडले का ? प्रभू, कृपा करून मला क्षमा करा. तुम्हाला अजिबात त्रास होऊ नये, मला हे सहनच होत नाही. तुम्ही माझ्यावर रागावलात का ? जर मी काही चुकीचे लिहिले असेल, तर कृपा करून मला क्षमा करा. मी कसे वागावे हेच मला कळत नाही. कृपा करून या अशिक्षित स्त्रीला क्षमा करा. मला तुमच्या तब्येतीविषयी पत्रातून कळवा. तुम्ही बरे आहात ना ते कळवा.
माझ्यावर कृपा करा आणि मला अढळ प्रेमभक्ती प्रदान करा. माझे मन खंबीर बनवा.
स्वामी ! स्वामी ! मी हे सर्व लिहिलेले चुकीचे आहे का ? मी तुमच्याशी बोलण्याची एवढी मोकळीक घेत आहे, ते चुकीचे आहे का ? कृपा करून मला सांगा ना.
लोका समस्ता सुखिनो भवन्तु
तुमची प्रिय मीरा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा