गुरुवार, ६ जुलै, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "

प्रकरण नऊ  

साधनापथावरील पत्रे 

२७ नोव्हेंबर १९९१
माझ्या प्रिय भगवानांच्या दिव्य चरणकमली ,
                        अनंत कोटी प्रणाम ! 
स्वामी, 
                 अशोकवनातील सीतेप्रमाणे मी रोज तुमच्या बोलवण्याची प्रतीक्षा करते आहे. मी चिंताक्रांत असताना मला श्री. चेट्टियारांचे पत्र मिळाले, जसा काही हनुमानाचा संदेश ! मी त्वरेने जाऊन पादुकांचे दर्शन घेतले. हनुमानाने सीतेला जशी अंगठी दिली तशा चेट्टियारांना मला पादुका दिल्या. पादुकांच्या आगमनाने मी आनंदात न्हाऊन निघाले. काल पैसे पाठवल्यांनंतर पादुका आमच्या झाल्या.  प्रभू, आता लवकरच तुम्ही तुमचे दिव्य चरण त्यावर ठेवा. 
               स्वामी, तुमच्या कृपेने माझे हृदय आनंदाने तुडुंब भरून गेले आहे. तुम्हीच ते ' ज्ञानभूमी ' नावाचे मासिक माझ्या हातात पडेल अशी व्यवस्था केलीत. मला चेट्टियारांचा पत्ता दिलात, मला त्यांच्या घरी पाठवलंत. त्यांची ओळख करून दिलीत. मला तुमच्या पादुकांचे दर्शन घडवलेत. ' मलाही अशा पादुका मिळाव्यात ' अशी तीव्र इच्छा निर्माण केलीत. तुम्हीच मला पादुकांची ऑर्डर नोंदवायला प्रवृत्त केलेत आणि आज मला पादुका मिळाल्या. आता तुम्हीच आम्हाला पर्तीला बोलावून तुमच्या दिव्य चरणस्पर्शानी पादुका पुनीत करायला हव्यात. 
तुम्ही मला दर्शन, स्पर्शन, संभाषण तिन्हीचा लाभ द्यायला हवा. 
तुमची कृपा चिरायु राहो !
तुमचा महिमा चिरायु होवो !
स्वामी, स्वामी प्रत्येक क्षणी मी तुमच्या निकट सान्निध्याचा, तुमच्या 
कृपेचा मनमुराद आंनद लुटते आहे. 
तुमची प्रेमळ बालिका 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा