ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" ज्या विश्वासाने तुम्ही सोनाराकडे सोने देता, त्याच विश्वासाने तुमचे मन गुरूंच्या हाती सोपवा. गुरूंना कदाचित तुमच्या मनाला वितळवण्याची, मुशीत घालून आकार देण्याची वा ठाकून ठोकून घडवण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु अजिबात काळजी करू नका. ते तुमच्या मनाला एखाद्या मूल्यवान रत्नाप्रमाणे बनवून परत देतील."
गुरु महिमा
आज गुरुपौर्णिमा, आपल्यासाठी अत्यंत मंगल दिवस. आपल्या गुरु श्री वसंतसाई, आपल्या सर्वांच्या अम्मा ह्यांच्या चरणी कमली कोटी कोटी प्रणाम ! अम्मा खरोखरच एक आगळ्या वेगळ्या गुरु आहेत. आपल्यासाठी त्या गुरुस्थानी आहेत. आपण कशासाठी जन्म घेतला, ते उद्दीष्ट गाठण्यासाठी संसारात राहूनही मनुष्याने कसे जीवन जगावे ह्या विषयीच्या ज्ञानाचे भांडार आपल्यासाठी खुले केले आणि ते ही स्वतःच्या जीवानुभवातून ! त्या आगळ्या वेगळ्या का आहेत हे त्यांच्या खाली दिलेल्या लिखाणातून आपल्या लक्षात येईल.
अम्मा म्हणतात,
" माझ्या लहान वयापासून मी सर्वांकडून धडे शिकत आहे. मी इतरांच्या चांगल्या सवयी पाहून त्या आत्मसात करत असे. ह्याच कारणामुळे मी सर्वांना माझे गुरु मानते. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी स्वामींकडे वैश्विक मुक्ती मागितली. सर्वांना गुरुदक्षिणा म्हणून मुक्ती द्यायची आहे. त्या सर्वांना मी गुरु मानते आणि मी तर केवळ शिष्य आहे. सर्वांपुढे मी विनयशील व विनम्र आहे. जर कोणी माझ्यामधील दोष दाखवले तर मी कधीही त्यांच्याबरोबर वादविवाद करत नाही उलट त्यांची क्षमा मागते. मी कधीही माझे बरोबर आहे असे सांगून माझा दृष्टिकोन इतरांवर लादत नाही. गांधीजींनी जसा देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढा दिला व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तसा मी प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी भगवंताशी लढा देत आहे व मी प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळवून देईन !"
वैश्विक मुक्ती प्रदायिनी, वैश्विक मुक्ती प्रदायिनी
वसंतसाई मैय्या
ॐ जय जय साई माँ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा