गुरुवार, २९ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " जादूटोणा, चमत्कार वा मंत्र याद्वारे, प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये स्थलांतरीत करता येत नाही." 

प्रकरण पंधरा 

रिक्त 

               एक जीव साधनेद्वारे विश्वात्मक रुप धारण करतो. तो त्याचे सर्वस्व आनंदसागरात मिसळून टाकतो. तो स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावतो. स्वामींनी मला माझी प्रेमशक्ती, मातृभाव, त्याग, साधेपणा, वैराग्य, दया, पावित्र्य, सर्व काही त्यांना अर्पण करण्यास सांगितले. मी स्वतःला पूर्ण रिक्त केले आणि स्वामींनी त्यांचे सत्य ह्या रिक्त घटामध्ये भरले. माझ्यामध्ये केवळ तेच भरून राहिले आहे. त्यांचा अर्थ असा की परमेश्वराशी परिपूर्ण एकतानता. ही संपूर्ण ऐक्याची स्थिती आहे. या साईरुपी परमानंदाच्या महासागरामध्ये मी तल्लीन झालेय. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २५ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."

प्रकरण पंधरा

रिक्त 

२३ ऑगस्ट २००३ 
वसंता - अवतार कसा अवतरतो ? 
स्वामी - तुझ्या तपाचे सामर्थ्य उच्च कोटीचे आहे. त्याबद्दल मी तुला इनाम देणे भाग आहे. दैवी कायद्यानुसार, एखाद्याने केलेल्या यज्ञानवर त्याचे पुण्य ठरवले जाते. उदा. जर एखाद्याने काही विशिष्ट संख्येने यज्ञ केले असतील तर त्याला इंद्रपद प्राप्त होते. त्याहून अधिक यज्ञ केले असतील तर ब्रह्म पद प्राप्त होते. तुझ्या प्रेमभक्तीसाठी तुला अवतारपद हेच एक इनाम मी देऊ शकतो. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. तुझ्याप्रेमासाठी मी तुला हेच एक देऊ शकतो. 
वसंता - मग मला ते नको. मला अवतारपद नको. 
स्वामी - अवतारपदास नकार दिल्यामुळे तुझ्या शक्तीचे सामर्थ्य वाढते आहे. जसे रामाने रावणाचे शीर कापले की तेथे नवीन शीर निर्माण होत होते, त्याचप्रमाणे तुझ्या त्यागामुळे तुझे तपोबल वृद्धिंगत होत आहे. 
वसंता - मग मी काय करू ? तुम्ही माझी सर्व शक्ती घ्या -  आणि मला रिक्त करा. मला फक्त तुम्ही हवे आहात . माझं तुमच्यावर निरतिशय प्रेम आहे. तुम्हाला माझ्या यातना कळत नाहीत का ?
स्वामी - प्रत्येक अवतार विशिष्ट अवतारकार्यासाठी अवतरित होतो. श्रीरामाने आपल्या दिव्य कोदंडाने राक्षसांचा संहार करण्यासाठी अवतार घेतला. श्रीरामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण कधीही लक्ष्याचा वेध घेतल्याशिवाय रहात नसे. श्री कृष्ण दुष्टदुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी आला होता. त्याचे शस्त्र होते दिव्य सुदर्शन चक्र. या युगामध्ये आपण संहाराविना परिवर्तन घडवणार आहोत. या करता केवळ एकाच शस्त्राची गरज आहे. तुझे प्रेम ! प्रेमावर फक्त तुझा अधिकार आहे. केवळ तूच त्याचा वापर करू शकतेस. त्यासाठी आवश्यक असणारी प्रेमाची सखोल तीव्रता दुसऱ्या कोणाहीकडे नसून फक्त तुझ्याकडेच आहे आणि म्हणूनच केवळ तूच प्रेमसाई बनून येऊ शकतेस. 
वसंता - स्वामी, मला काही नको. मला काही माहित नाही. मला फक्त तुमची पत्नी म्हणून यायचं आहे. स्वामी, माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे माझं तुमच्यावर. मी अवतार म्हणून येणार नाही.
स्वामी - मी तरी काय करू ? यासाठी इतर कोणीही योग्य नाही. तुझ्यासारखं अतीव प्रेमही कोणाकडे नाही. केवळ तूच एवढ्या प्रेमाचा वर्षाव करत आहेस. 
बर, ठीक आहे, आपण एक काम करू. तू तुझं सर्वकाही उदा. तुझे प्रेम, साधेपणा, कारुण्य, पावित्र्य आणि तुझे सर्व सद्गुण मला अर्पण कर. 
वसंता - स्वामी, माझ्याकडे जे काही आहे ते सर्व मी तुम्हाला अर्पण करते. कृपया त्याचा स्वीकार करा. 
(मी माझ्या ओंजळीतून स्वामींच्या ओंजळीत उदक सोडून सर्वकाही त्यांना अर्पण केले.) 
वसंता - स्वामी, तुम्ही म्हणाला होतात की मी माझ्या शक्ती इतरांना दिल्या की त्या कमी न होता वाढतच जातात. आत्ताही तसेच घडेल का ? 
स्वामी - नाही. तू तुझे सर्वस्व मला अर्पण केलेस. तू आता रिक्त झालीस. मी माझ्या सत्याने हा रिक्त घट भरेन. तुझ्यादेहामध्ये सत्य भरून उरेल व तुझे भावविश्व या साईनामक देहात वास करेल, आता मीच प्रेम साई बनून येईन. 
वसंता - स्वामी, आता मी खूप खूप आनंदात आहे. 
स्वामी - अगं वेडाबाई ! तू परत एकदा चुकलीस ! तू  सत्य आहेस. मी तुझ्यामध्ये आहे. तू माझ्यात आहेस.
ध्यान समाप्ती 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मोती तिसरा 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्  || 

               जे भक्त अन्य कोणत्याही गोष्टीची इच्छा न धरता निरंतर परमेश्वराचे चिंतन करतात त्यांचे योगक्षेम, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी परमेश्वर घेतो. आई जशी आपल्या लहान मुलाची सर्वतोपरिने काळजी घेते तसा परमेश्वर आपल्या भक्ताची काळजी घेतो. 
              अनन्याश्चिन्तयतो - ह्याचा अर्थ ज्याच्या मनात परमेश्वराशिवाय अन्य कोणतेही विचार नाहीत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की परमेश्वराची अशी विशेष भक्ती करणे खरच शक्य आहे का ? हो निश्चित शक्य आहे. माझ्या जीवनाचे उदाहरण तुमच्या समोर आहे. मी परमेश्वराशिवाय अन्य कोणताही विचार करत नाही. बाकीच्या सर्व गोष्टी माझ्या विस्मरणात गेल्या आहेत. माझे बाह्य जगताशी अजिबात संबंध नाहीत. केवळ भगवान माझ्या जीवनाचा श्वास आहेत. त्यांच्या विचारांशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. मी त्यांना सर्वस्व समर्पित केल्यामुळे तसेच मी त्यांचे सतत स्मरण करत असल्यामुळे ते माझ्या सर्व गोष्टींची काळजी घेतात. 
              माझ्याकडून मी कोणतेही प्रयत्न न करता माझे जीवन सुरळीतपणे चालले आहे. सांसारिक जीवन महासागरासारखे असते. हा महासागर कसा पार करायचा ? केवळ परमेश्वराच्या चरण कमलांवर पूर्ण शरणागती पत्करून. एकदा का तुम्ही परमेश्वराशी पूर्ण शरणागत झालात की महासागर पार करणे अगदी सोपे होऊन जाते. जेव्हा नौका वल्ह्यांविना चालते. ह्याचा अर्थ भक्ताचे जीवन विनासायास चालू आहे. कोणतीही इच्छा वा महत्वाकांक्षा न ठेवता सतत परमेश्वराचे चिंतन करणे म्हणजे परमानंदाची अनुभूती ! जेव्हा तुम्ही ह्या परमानंदाची गोडी चाखता तेव्हा त्याच्यापुढे अन्य कोणत्याही आनंदाचा काय उपयोग ? हे अनन्याश्चिन्तयन्तो पोटी मिळणारे फळ आहे . ज्याच्या मनात भगवानांच्या विचारांशिवाय अन्य कोणतेही विचार नसतात त्यांना हा परम आनंद लुटता येतो. जीवनातील आसक्ती, अडचणी आणि चिंता ह्यांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. मी सदैव भगवानांशी एकत्व अवस्थेत असल्यामुळे हरघडी मी परामानंद अनुभवते. 
             प्रत्येकजण ही अवस्था प्राप्त करू शकतो. ह्याच हेतूने भगवद् गीतेचा जन्म झाला आहे. विनोबा भावे नेहमी म्हणत, " जोपर्यंत तुम्ही वेदमार्गावरून वाटचाल करत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्ती नाही. " प्रत्येकाला सहजपणे वेद शिकणे शक्य नाही मग सामान्य मनुष्याचे प्रारब्ध काय ? त्यासाठीच गीतेचा जन्म झाला. 
                मनुष्याला वेद शिकण्याची आवश्यकता नाही. व्रत वैकल्ये करण्याची गरज नाही. मोक्षप्राप्तीचा अगदी सोपा उपाय, तुम्ही करत असलेले प्रत्येक कर्म भगवानांना अर्पण करा. आपण आपल्या प्रत्येक कृतीचे भक्तीकर्म वा योग ह्यामध्ये रूपांतर केले पाहिजे. गीतेतील कर्मयोगाच्या तिसऱ्या अध्यायात सांगितल्यानुसार जर तुम्ही तुमचे प्रत्येक कर्म परमेश्वराला समर्पित करण्याच्या भावनेने केलेत तर त्याचा योग्य होतो. 
              मी वयाच्या २१ व्या वर्षी गीता वाचायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर त्यातील शिकवण आचरणात आणण्यास सुरुवात केली. तेव्हाची वसंता आणि आताची वसंता ह्यांच्यामध्ये खूप फरक आहे. हा बदल कसा घडला ? परमेश्वर सतत आपल्या बरोबर आहे. ह्या कल्पनेची ही फलश्रुती आले. ९ व्या अध्यायामध्ये लोखंडाचे सोन्यामध्ये परिवर्तन करण्याचे सामर्थ्य आहे. गीतेतील शिकवणीचे दैनंदिन जीवनात आचरण करणे पुरेसे आहे. ह्यासाठी निर्धार आणि एकाग्रता हे दोन्ही गुण आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक कर्म परमेश्वराशी जोडता तेव्हा त्यातून प्रचंड शक्ती निर्माण होते. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या साई गीता प्रवचनम्  या पुस्तकातून. 


जय साईराम  

गुरुवार, २२ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम , वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे. "

प्रकरण पंधरा

रिक्त

             मी अखंड रडत होते. सर्वजण मला रडण्याचे कारण विचारत होते, मी काहीच सांगितले नाही. हा सर्व त्याचा खेळ आहे. माझे मन विषण्ण झाले होते. रात्रभर मनामध्ये भय, चिंता आणि औदासिन्य भरून राहिले होते.

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....  
जय साईराम 

रविवार, १८ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वराचे अखंड चिंतन म्हणजे परमेश्वराचे अखंड सान्निध्य."

प्रकरण पंधरा 

रिक्त 

२१ ऑगस्ट २००३ ध्यान 
स्वामींनी मला सांगितले की मी पुढील जन्मात प्रेमसाई बनून येईल. ते काय म्हणताहेत हे न समजल्यामुळे मी रडू लागले .... 
स्वामी - सर्वांना मुक्ती मिळवून देण्याची तुझी इच्छा हा मातृभाव आहे. हा भावच तुला अवतार बनवेल. दोन अवतारांच्या अवतरणास तू कारण आहेस. तुझा प्रेमभाव घेऊन सत्यसाई अवतरला तर तुझा मातृभाव घेऊन प्रेमसाई येईल. 
वसंता - स्वामी, मी नाही येणार. मला स्त्री बनूनच तुम्ही अनुभूती घ्यायची आहे. 
स्वामी - तू निश्चित माझी अनुभूती घेशील. यापूर्वी कोणीही वैश्विक मुक्ती मागितलेली नाही. संपूर्ण मानववंशासाठी असलेला तुझा कारुण्यभावच तुला अवतार म्हणून घेऊन येईल. ह्यामुळेच प्रेमसाई शक्ती स्वरूप म्हणून ओळखले जातील. तुझे अपरिमित प्रेमच अनंत शक्ती बनून प्रेमसाई अवतार धारण करेल. 
वसंता - स्वामी, तुम्ही काय सांगताय ? मी प्रेमसाई अवतार बनून येणार असे तुम्ही म्हणालात का ? मला हे शक्य नाही. स्वामी, मी तुमच्यावर प्रेम करते ! 
स्वामी - तुझ्या तपाचे सामर्थ्य अति महान आहे. 
वसंता - माझे संपूर्ण तपोबल तुम्ही घ्या, मला रिक्त करा, मला रिक्त करा. माझे तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही मला प्राणाहुनही अधिक प्रिय आहात. मला फक्त तुमची अनुभूती घ्यायची आहे ! मला फक्त तुम्ही हवे आहात. मला तुमच्याशिवाय दुसरे काहीही नकोय. तुम्ही मला समजू शकत नाही का ? माझ्या जीवाची घालमेल तुम्हाला कळत नाही का ? अरे देवा, मी का जन्मास आले ? माझ्या प्रेमाचे हेच का प्राक्तन ? 
स्वामी - रडू नकोस , शांत हो ! शांत हो ! मी काय म्हणतोय ते ऐकतेस का ? 
वसंता - आता काही बोलू नका. मी पुट्टपर्तीला येईन आणि तुमच्यासमोर प्राणत्याग करेन. माझे प्रेम शुद्ध आहे, पवित्र आहे ... फक्त तुमच्यासाठीच आहे. तुम्ही दुसऱ्या एखाद्याला अवतारपद बहाल करा. मला माझे स्वामी द्या ! वैश्विक मुक्तीची सबब सांगून तुम्ही मला फसवलेत आणि पुन्हा पुन्हा तुम्ही माझी फसवणूक कराल. मी फक्त स्त्री म्हणूनच जन्म घेईल. स्वामी , माझे तुमच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आधी तुम्ही म्हणालात की प्रेमसाई अवतारात तुम्ही माझ्याशी विवाह कराल आणि आता तुम्ही म्हणता की मी प्रेमसाई बनून येईल. मला ते नको आहे. माझे तुमच्यावर प्रेम आहे. हे शब्द उच्चारताच माझा जीव हे शरीर सोडू देत. 
स्वामी - ठीक आहे, ठीक आहे ! रडू नकोस. तू प्रेमसाई होऊन येऊ नकोस. मग तर झालं ! आता रडू नकोस. 
वसंता - स्वामी, तुम्ही माझ्या सर्व शक्ती घ्या आणि मला रिक्त करा. 
स्वामी - तुझ्या तपामधून अवतार होण्याइतकी प्रचंड शक्ती तू मिळवली आहेस. तरीसुद्धा माझ्यावर असलेल्या तुझ्या अतीव प्रेमामुळे तू सर्व काही नाकारत आहेस. तुझ्या या प्रेमाच्या बदल्यात मी तुला काय देऊ ?
ध्यानसमाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम
   

गुरुवार, १५ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते. व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते."
प्रकरण पंधरा 
रिक्त 
             " त्याग, त्याग, त्याग ! केवळ त्याग करूनच आपण अमृतत्व प्राप्त करू शकतो. मोक्ष केवळ त्यागानेच प्राप्त होतो."

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, ११ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

       " परमेश्वराप्रत असणारी अढळ श्रद्धा, परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे."

प्रकरण चौदा 

वसंतमयम् 

               परमेश्वर प्राप्तीचा ध्यास, तळमळ आणि अश्रू याद्वारे स्वामींनी मला या अवस्थेप्रत येण्यासाठी तयार केले. मला परमेश्वर प्राप्तीची इच्छा होती. मला त्यांच्याशी विवाह करायचा होता. दिव्य दर्शन प्राप्त झाल्यांनतर परमेश्वरांनी दिलेल्या अनेक अनुभवांचा आनंद लुटत असूनही मी अतृप्तच होते. मला भगवंतांकडून अजून काही हवे यासाठी मी रडत होते, विलाप करत होते. त्याची भक्ती करायला मला सहस्त्र कर, सहस्त्र नेत्र आणि सहस्त्र मुखं हवीत यासाठी मी आर्जवं करत होते. या सहस्त्र अवयवांनीही मी संतुष्ट नव्हते. मी प्रार्थना करत होते की, संपूर्ण जगाने माझ्यासारखे होऊन फक्त परमेश्वराला धरून ठेवले पाहिजे. 
             " स्वामी, माझ्या प्रेमाने संपूर्ण मानवजातीमध्ये प्रवेश केला आहे. त्याबद्दल मला आनंद आहे ; परंतु वृक्ष, वल्ली, माती यांचे काय ? त्यांच्यामध्ये काही बदल व्हायला नको का ?" 
                      मी डोळे मिटून प्रार्थना केली. 
स्वामी म्हणाले, 
                      " वृंदावनाच्या मातेच्या विचार कर. त्या, मातेसारखाच सर्वत्र बदल घडेल."
               सत्ययुगामध्ये संपूर्ण जगच वृंदावन बनून जाईल. वृक्ष, वल्ली, पक्षी, प्राणी, मानव यासर्वांमध्ये राधा कृष्णाचे प्रेम भरून उरेल. संपूर्ण मानवजात प्रेमामध्ये चिंब भिजून जीवनमुक्त गोपगोपींप्रमाणे दिव्य लीलांचा आणा लुटेल. एका वसंतेच्या भावविश्वामधून वसंतमयम झाले. वसंतमयम  म्हणजे विश्वात्मक भाव. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ८ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे, अन्य काही नाही."

प्रकरण चौदा 

वसंतमयम् 

               त्यानंतर काय होईल ? माझ्या धगधगत्या प्रेमाची तीव्रता कमी होईल का ? 
               माझे प्रेमकूजन संपूर्ण विश्वामध्ये निनादत राहील. अखिल विश्वाच्या नेत्रांनी मी भगवंताच्या सौंदर्याचे रसपान करेन. या अगणित नेत्रांनी त्यांचे  दर्शन घेऊन मी आनंदात न्हाऊन निघेन. मी प्रत्येक  रुपामधून हात जोडून त्यांची प्रार्थना करेन, त्यांच्या चरणांची सेवा करेन. माझे प्रेम सर्वत्र झिरपत जाईल. मी सर्वव्याप्त होईल. निर्मितीच्या कणकणामध्ये माझे अस्तित्व असेल. जगातील समग्र ५८० कोटी लोक वसंता होतील, फक्त वसंता ! सर्वजण जीवनमुक्त असतील. ते फक्त परमेश्वराचा ध्यास घेतील, त्याच्यासाठी अश्रू ढळतील. त्यांची इंद्रियं, मन आणि सर्वच केवळ परमेश्वराच्या विचारात असतील, परमेश्वर प्राप्तीसाठी मनन, चिंतन करतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

रविवार, ४ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " तुमच्या कर्णेंद्रियानी केवळ परमेश्वराविषयी श्रवण केले पाहिजे, अन्य काही नाही."

प्रकरण चौदा

वसंतमयम् 

              माझे प्रेम आता सर्वत्र पसरत आहे ! ते काही मी या जन्मात केलेल्या केवळ साठ वर्षांच्या खडतर तपश्चर्येमुळे नव्हे, तर पाच हजार वर्षांपासूनचे राधेचे प्रेम अखिल विश्वामध्ये पसरत आहे. माझ्यामधून ओसंडून वाहणारे प्रेम, माझ्या सतत वाहणाऱ्या अश्रूंद्वारे आणि माझ्या पुस्तकांद्वारे सर्वत्र पसरत आहे. आता मी अशी प्रार्थना करते की, प्रत्येक व्यक्तीमध्ये माझ्या प्रेमाचा प्रवेश होऊन प्रत्येक जीवापर्यंत ते पोहोचले पाहिजे. माझा हा विचार स्पंदन बनून सर्वांमध्ये प्रवेश करतो. प्रत्येकामध्ये माझे प्रेम भरून राहू दे. प्रत्येकाला परमेश्वर प्राप्तीची माझी उत्कट इच्छा आणि माझे भावविश्व यांची अनुभूती येऊ दे. म्हणजे त्यानंही परमेश्वर प्राप्तीचा ध्यास लागेल, परमेश्वर प्राप्तीची अनिवार ओढ लागेल. सर्व परमेश्वराच्या विरहदुःखात गुरफटतील. हेच वसंतमयम् आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

            " तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे, अन्य कहीही नाही. "

प्रकरण चौदा

वसंतमयम्

              कशासाठी ही आस्था ? का हे प्रेम ? ' स्वामींचं प्रेम पुरेसं नाहीय ' असं मला नेहमी का वाटत असतं ? परमेश्वराची अनेकदा अनुभूती घेऊनही मी कधीही तृप्त झाले नाही. माझ्यामध्ये सतत ' मला भगवंत हवा ' ही धगधगती तृष्णा का होती ? त्यावर मी कधी ताबा मिळवू शकेन ? स्वामींना प्राप्त केल्यानांतरही माझ्या डोळ्यातील अश्रू का थांबत नाहीत ? हा काही आजकालचा ध्यास नव्हे. अगदी बालवयापासून मी हा ध्यास घेतला आहे. बालवायत मी लिहिलेली ही कविता पुढे देत आहे. 

रसग्रहण कराया तुझ्या मनमोहक रूपाचे 
सहस्त्र नेत्र असती इंद्रदेवास 
का न लाभले सहस्त्र नेत्र मज ?
असती मात्र दोन नेत्र मज !
तुझे दिव्य रूप पाहण्या, अपुरे हे दोन नेत्र 
हे परमेशा, इंद्रासम का न लाभले सहस्त्र नेत्र मज ?


सहस्त्र जिव्हा असती आदिशेषास 

असे मात्र एक जिव्हा मज तुझ्या स्तवनास 
कृष्णा ! गोविंदा !मुरली !मुकुंदा !
अच्युता ! अमला ! हरि ! प्रभू !
माझ्या जीवा ... हे परमेशा ! हे नसे पुरेसे 
गुणगान तुझे कराया,
आदिशेषासम का न दिल्या मज सहस्त्र जिव्हा ?


सहस्त्र कर असती कार्तवीर्य अर्जुनास 

सहस्त्र कर देऊनी कृतार्थ कर मज 
हे प्रियतम कृष्णा, विनविते मी ... 
हे दान सहस्त्र करांचे -


- तुझे पूजन कराया   
- पुष्पार्चन कराया  

- दिव्य चरणांना मिठी घालाया 


का घेतला नरजन्म मी अंधेरी नगरीत ?


- ना मज सहस्त्र नेत्र 
- ना मज सहस्त्र जिव्हा 
- ना मज सहस्त्र कर 

काय करू मी, काय करू ? 



उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
 

जय साईराम