ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण केलेले सत्कर्मसुद्धा परमेश्वराच्या साक्षात्कारामध्ये अडथळा बनू शकते."
प्रकरण सहा
सतीत्व
९ मार्च २००९ ध्यान
वसंता - स्वामी, मला तुमचे चरण दर्शन हवे आहे. ८० वर्षे तुमची नुसती पायपीट चालू आहे. तुम्ही किती त्रास करून घेताय. मला तुमचे पाय चुरायचे आहे. आता पुरे झालं, चला, आपण जाऊ या.
स्वामी - रडू नकोस. थोड्याच कालावधीत आपण एकत्र असू.
वसंता - नऊ वर्षांनी आपण हे जग सोडून जाऊ आणि त्यांनतर ५ वर्षांनी आपण पुन्हा जन्म घेऊ. नंतर १६ वर्षांचा विरह. मला हे काही नको, काही नको !
स्वामी - तेव्हा विरह नाही. बालपणापासूनच आपण एकत्र असू . तू रात्री झोपल्यानंतर मी माझ्या घरी जाईन. आपण कॉलेजमध्ये असू त्या काळात आपल्याला थोडा विरह सोसावा लागेल. अन्यथा नाही.
वसंता - हे कसे काय स्वामी ? प्लिज, मला अधिक स्पष्ट करून सांगा ना.
स्वामी - तुझ्या बालपणी, तू झोपेपर्यंत सर्वजण तुझ्याजवळ असतील. तुला गाढ झोप लागली की मगच आम्ही तेथेन बाहेर पडू. कधी कधी तुझे भाऊ आणि मी तुझ्या घरी झोपू. तर कधी तू माझ्या घरी माझ्या आईजवळ झोपशील. सकाळी माझी आई मला, तुला उठवून खाली घेऊन येण्यास सांगेल. मी येऊन तुला उठवेन आणि हळूच तुझा हात धरून तुला खाली घेऊन येईन.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम