मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प सोळावे 
मातीची कळकळ 

              विश्वाचा कारभार कर्मकायद्यानुसार चालतो कोणाचीही ह्या कायद्यापासून सुटका होत नाही. पंचमहाभूते, नवग्रह, देवदेवता ह्यांच्यासाठीही हा कायदा लागू आहे. आपल्या चांगल्या वाईट कर्मांनुसार हे कर्माचे जाळे विणले जाते. ह्यामधून कोणीही सुटू शकत नाही  परंतु जसे तुरुंगातील एखाद्या कैद्याला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप झाला आणि त्याने राष्ट्रपतींना, भविष्यात चांगल्या वर्तनाची हमी देऊन त्यांच्याकडे दयेचा अर्ज केला तर राष्ट्रपती त्याला माफी देऊ शकतात. 
             त्याचप्रमाणे जेव्हा मी भगवानांकडे करुणा भाकते तेव्हा त्यांच्या कृपावर्षावाने कर्म धुतली जातात अशा तऱ्हेने तुम्ही सर्वजण तुमचा गतकाळ मागे सोडून सत्याला जागृत केले पाहिजे व परमेश्वरप्राप्तीचा निर्धार केला पाहिजे. असे केल्याने तो करुणामयी परमेश्वर सर्व अडथळे दूर करून तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवेल. हा परमप्रभू, देवाधिदेव, विश्वेश्वर, १४ भुवनांचा अधिपती, अत्यंत करुणाभावाने आपल्याला मुक्ती देण्यासाठी येथे अवतरला
            मृत्यूदंड अधिक सोपा व सुलभ आहे कारण वेदनेतून त्वरित मुक्ती मिळते. याउलट, आपण आपल्या जीवनकालात भोगतो  त्या वेदना, व्याधी आणि समस्या म्हणजे जन्मठेपेची सजा. ही सजा पुढच्या जन्मातही चालू राहते म्हणून सर्वांनी या जन्ममृत्युच्या चक्रातून आपली मुक्तता करून घ्यावी अशी माझी इच्छा आहे. तुमच्या सर्व गुन्ह्यांसाठी मी परमेश्वराकडे माफी मागत आहे. तुमचा माफीचा अर्ज मी त्याच्याकडे पाठवतेय व तुम्हाला माफी मिळावी यासाठी प्रार्थना करतेय. तुमच्यासाठी ह्या मातेचे काळीज फाटते आहे व ती परमेश्वराकडे वैश्विक मुक्ती मागते आहे. माझा हृदयनिवासी प्रभु माझा माफीचा अर्ज स्वीकारेल ह्याची मला खात्री आहे. 
             कलियुग अत्यंत टोकाला गेल्यावर सत्ययुग आणणे हे सोपे कार्य नाही ते आणण्यासाठी, मानवाला सदाचाराचा मार्ग दाखवण्यासाठी परमेश्वराला स्वतः यावे लागले. हा विश्व विधाता, जगात जगद् नियंता सामान्य मानवाचा वेश धारण करून पृथ्वीवर वावरत आहे. त्याच्या मानवी रूपाने भ्रमित होऊ नका. हा केवळ बाह्यात्कारी वेश आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही जी तो करू शकणार नाही. त्याच्या एका करंगळीच्या हालचालीने अखिल विश्वास मुक्ती मिळू शकते. 
             तुम्ही भवसागरात गटांगळ्या खात आहात. त्याच्याशी शरणागत व्हा ! तो तुमची प्रतिक्षा करतोय. मुक्तीसाठी प्रार्थना करा. हा वर प्राप्त केल्यानंतर तुमच्या सर्व समस्या दूर होतील निदान. निदान आता तरी शरणागत व्हा.

संदर्भ - श्री वसंत साईंच्या Bliss ... Bliss ... Bliss भाग -२ ह्या पुस्तकातून 

जय साईराम 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा