गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " चांगली फलप्राप्ती होण्यासाठी तुम्ही तुमचे सर्व भाव ईश्वराभिमुख करावेत. यानेच तुम्हाला मुक्ती मिळेल."

प्रकरण सहा 

सतीत्व 

              ६) माझा देह, माझा जीवप्रवाह व माझे रक्त कोणाशीही जोडले जाऊ नये, असे म्हणून मी विलाप करत होते. तेव्हा स्वामींनी माझ्या जन्माचे रहस्य उघड केले, ते म्हणाले, " तुझा जन्म तुझ्या आईवडिलांपासून झालेला नाही. माझ्या देहामधून ज्योत होऊन तू तुझ्या आईच्या गर्भात प्रवेश केलास. अखेरीस तू ज्योतीस्वरूप धारण करून माझ्यात एक होशील." आमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी माझे रूप मिळते जुळते नव्हते, या गोष्टीचे आमच्या गावातील लोकांना खूप आश्चर्य वाटे. ते म्हणत," हॉस्पिटलमध्ये नक्कीच बाळांची अदलाबदल झाली असणार." या गोष्टीची स्वामींनी मला आठवण करून दिली. याविषयी मी आधीच्या प्रकरणात लिहिले आहे. सर्वसाधारणपणे रक्ताच्या नात्यामुळे मुले, आपले आईवडील, आजीआजोबा यांच्यासारखे दिसतात . माझा जन्म स्वामींमधून झाल्यामुळे माझे अन्य कोणाशीही नाते नाही. माझा जीवप्रवाह, माझ्या देहामधील अणुरेणू, प्रत्येक पेशी, सर्व काही स्वामीच आहेत. माझा देह स्वामींशिवाय कोणाशीही जोडलेला नाही. 



उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा