ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सर्व भाव स्पर्श संवेदनेमधून उगम पावतात. स्पर्शसंवेदनेचा पाया शरीर आहे. जन्मामुळे देह प्राप्त होतो. "
प्रकरण सहा
सतीत्व
८) स्वामी म्हणाले, " पुढील अवतारात तू प्रेमसाईची पत्नी प्रेमा होशील." मी म्हणाले, " माझ्या अनेक अटी मान्य असतील तर मी प्रेमा व्हायला तयार आहे. माझ्या वयाच्या ५ व्या वर्षांनंतर कोणीही मला पाहू नये. आमचा जन्म होण्यापूर्वीच आमच्या पालकांनी आमचा विवाह निश्चित केला असेल. त्यामुळे कोणीही माझ्याकडे गैरदृष्टीने पाहणार नाही. पुढे मी म्हणाले, " मला अपत्य नको. जर अपत्य जन्माला आले तर तुम्ही त्याच्या जन्माच्या वेळी माझी काळजी घेतली पाहिजे. मी कोणत्याही डॉक्टरकडे जाणार नाही. " स्वामींनी या सर्वांचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, " या सर्वांमधून तुझ्या पातिव्रत्याच्या उच्चपातळी दिसून येते. " मी म्हणाले, " मला कोणत्याही मंत्राद्वारे किंवा खिरीच्या प्रसादामधून जन्मलेले मूल नको." पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला जातो. यज्ञदेवता प्रसन्न होऊन खिरीचा प्रसाद देते. ते ऋषींनी उच्चारलेल्या मंत्राचे फळ असते. त्यांनी स्वतःच्या मनामध्ये तयार केलेल्या प्रतिमेनुसार अपत्य जन्मते. " ऋषींच्या मनातील रूपरेषेनुसार जन्मणारे अपत्य मला नको. " प्रेम साई अवतार या पुस्तकामध्ये मी याचा उल्लेख केला आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा