गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

          " मनाची जडणघडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा काहीही स्पर्श करणार नाही. "

प्रकरण सहा

सतीत्व 

            ९)  माझे ब्लाऊज शिंप्याने शिवू नये, फक्त स्वामींनी शिवावेत. जर एखाद्या शिंप्याला माझे ब्लाऊज शिवायचे  झाले तर त्याला माझे माप माहीत होईल, मला ते नको आहे. प्रेम अवतारात, माझ्या जन्मापासूनच माझे कपडे प्रेम साईंची आई शिवेल. कोणीही व्यक्ती असा विचार करेल का ? मानवी मनामध्ये असे विचार येतील का ? परमेश्वराशी लग्न करण्याचे कार्य सामान्य व्यक्तीला शक्य आहे का ? या सर्व गोष्टी मी का करते आहे ? जर एखाद्याला परमेश्वराशी लग्न करायचे असेल तर त्याने असे विशुद्ध जीवन जगले पाहिजे. 
            १०) मला कोणीही साडी दिली की मी ती प्रथम स्वामींच्या पादुकांवर ठेवते आणि स्वामींचे आशीर्वाद मिळाल्यानंतरच नेसते. 
            ११) आम्ही वसिष्ठ गुहेमध्ये गेल्यावर आम्हाला एक सद्भक्त म्हणाले, " माझ्या पोटामध्ये सीतामाईचे मंगळसूत्र आहे. स्वामी येतील आणि तुमच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतील. मी मोठ्याने रडून स्वामींना म्हणाले, " मी मनुष्याच्या पोटातून आलेले मंगळसूत्र अजिबात घालणार नाही ! " 
            १२) बालपणीही मी इतरांबरोबर मिसळत नसे. माझे लग्न होईपर्यंत माझ्या दोन चुलतभावांव्यतिरिक्त मी अन्य कोणत्याही पुरुषाशी बोलले नाही. मी इतर पुरुष वा स्त्रियांबरोबर बोलत नसे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा