ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" केवळ सर्वसंगपरित्याग केल्याने मोक्षप्राप्ती होते."
प्रकरण सहा
सतीत्व
१५) मी स्वामींना अनेकदा सांगितले, " तुम्ही मला व्यक्तिशः कधीही काहीही दिले नाहीत. तुम्ही स्वतःच्या हाताने मला एक हेअरपीनसुद्धा देणार नाही का ?" एक दिवस मला अमेरिकेहून एक खडे जडवलेला सुंदर बॉक्स मिळाला सर्वजण म्हणाले, " हा बॉक्स नक्कीच रत्नांनी भरलेला असेल." आम्ही तो उघडला तर काय ! त्यामध्ये खड्यांच्या दोन हेअरपिन्स होत्या. स्वामी म्हणाले, " एखादं लहान मूल जसं आईकडे रडून एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करते तसं तू माझ्याकडे सेफ्टी पिन्स, हेअरपिन्सचा हट्ट केलास. कोणतीही गोष्ट तू माझ्याकडेच मागतेस. भगवद्गीतेतील खालील श्लोकाचे हे उत्तम उदाहरण आहे.
अनन्याश्चितयन्तो मां ये जनाः पर्युपासते |
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ║
या श्लोकाच्या भावार्थाला अनुसरून स्वामींनी मला सर्व काही दिले. मला एकदा मोठी सेफ्टी पीन हवी होती, कुठे मिळाली नाही. नंतर प्रभाकरना दुर्गेच्या मूर्तीजवळ एक मोठी सेफ्टी पीन सापडली. ' प्रेम अवतार ' या पुस्तकात मी लिहिले आहे की मी पाच वर्षांची असताना स्वामी मला सेफ्टी पीन देतील. ' सेफ्टी पीन आणि सेफ्टी लाईफ (सुरक्षित जीवन)' या प्रकरणात मी लिहिले आहे सेफ्टी पीनपासून ते माझ्या जीवनाच्या सुरक्षितते पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मी पूर्णपणे स्वामींवर अवलंबून आहे. ह्या जन्मातील तपामुळे पुढील अवतारात स्वामी माझ्यासाठी सर्व काही करतील. माझे जीवन पूर्णपणे स्वामींवर केंद्रित आहे माझे खाणे, पिणे, चालणे, बोलणे केवळ स्वामी आहेत. माझे जीवन असे आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा